शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आता गुगल सर्चद्वारे बुक होणार रेल्वे तिकीट! इंटरसिटी बसेससाठीही असाच ऑप्शन येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 16:58 IST

google new feature : सध्या, हे फक्त काही देशांमध्ये लाँच होणार आहे, परंतु कंपनीने या फीचरचा अधिक विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत ही सेवा इतर देशांमध्येही उपलब्ध होणार आहे.

नवी दिल्ली : गुगलने (Google) एक नवीन फीचर जाहीर केले आहे, जे युजर्संना केवळ सर्चद्वारे निवडक देशांमध्ये ट्रेन तिकीट खरेदी करण्यास परवानगी देईल. सध्या, हे फक्त काही देशांमध्ये लाँच होणार आहे, परंतु कंपनीने या फीचरचा अधिक विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत ही सेवा इतर देशांमध्येही उपलब्ध होणार आहे.

गुगलने आता जर्मनी, स्पेन, इटली आणि जपानमधील युजर्संना आता निवडक देशांमध्ये आणि आसपासच्या प्रवासासाठी थेट गुगल सर्च (Google Search) वर रेल्वे तिकीट खरेदी करण्याचा एक सोपा ऑप्शन दिला आहे. आपल्या ट्रॅव्हल टूल्समध्ये सस्टेनबिलिटीचा समावेश करण्यात आल्याचे गुगलने म्हटले आहे.

"काही ट्रिपसाठी, ट्रेनद्वारे जाणे हा एक चांगला पर्याय असू शकतो, परंतु A ते B पर्यंत जाण्यासाठी किमती आणि वेळापत्रकाच्या माहितीसाठी थोडे वेगळे सर्च करावे लागते", असे गुगलमधील ट्रॅव्हल प्रॉडक्ट्सचे व्हीपी रिचर्ड होल्डन म्हणाले. तसेच, त्यांनी मंगळवारी उशिरा एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले की, "आजपासून, तुम्ही थेट Google Search वर ट्रेनची तिकिटे खरेदी करू शकता, विशेषत: जर्मनी, स्पेन, इटली आणि जपानसह काही निवडक देशांमधील प्रवासासाठी." 

तुमच्यासाठी फक्त सर्च करा बेस्ट ट्रेनतुम्हाला फक्त सर्च करायचे आहे, जसे की  'बर्लिन ते व्हिएन्ना ट्रेन्स' आणि तुम्हाला सर्च रिझल्ट्समध्ये एक नवीन मॉड्यूल दिसेल, जे तुम्हाला तुमची प्रस्थान तारीख (Departure Date) निवडू आणि उपलब्ध ऑप्शनची तुलना करू देईल. एकदा तुम्ही तुमच्यासाठी योग्य असलेली ट्रेन निवडल्यानंतर, तुमचे बुकिंग पूर्ण करण्यासाठी भागीदाराच्या वेबसाइटवर थेट लिंक दिली जाते.

बसेससाठीही अशीच सेवा आणण्यात येणाररिचर्ड होल्डन म्हणाले, "आम्ही इतर रेल्वे सेवा प्रदान करण्याऱ्या संस्थांशी जोडले जाऊ, तसे  ही सुविधा अधिक ठिकाणी पसरेल. आम्ही नजीकच्या भविष्यात बस तिकिटांसाठी अशाच फीचरची चाचणी सुरू करण्याची योजना आखत आहोत, जेणेकरून तुमच्याकडे इंटरसिटी प्रवासासाठी अधिक ऑप्शन उपलब्ध असतील." दरम्यान, फ्लाइट आणि हॉटेल या दोन्हीसाठी नवीन फिल्टरसह, गुगल सर्चवर अधिक कायमस्वरूपी ऑप्शन शोधणे सोपे आहे.

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञानrailwayरेल्वे