शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

Google चं नवं फीचर येणार, आपोआप लोकेशन डेटा डिलीट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 14:46 IST

गुगलचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. गुगल लवकरच आपल्या युजर्सना लोकेशन डेटा मॅनेज करण्याची सुविधा देणार आहे. यामुळे युजर्सना आपल्या डिव्हाईसवरून स्टोर लोकेशन डेटा ऑटोमॅटीकली डिलीट करण्याचा एक पर्याय मिळणार आहे.

ठळक मुद्देगुगल लवकरच आपल्या युजर्सना लोकेशन डेटा मॅनेज करण्याची सुविधा देणार आहे.युजर्सना आपल्या डिव्हाईसवरून स्टोर लोकेशन डेटा ऑटोमॅटीकली डिलीट करण्याचा एक पर्याय मिळणार आहे. गुगलचं हे नवीन ऑटोमॅटीक डेटा डिलीशन टूल युजर्स आपल्या स्मार्टफोनमध्ये जाऊन गुगल अकाऊंटच्या सेटींगमध्ये अ‍ॅक्सेस करू शकतात.

नवी दिल्ली - गुगलचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. गुगल लवकरच आपल्या युजर्सना लोकेशन डेटा मॅनेज करण्याची सुविधा देणार आहे. यामुळे युजर्सना आपल्या डिव्हाईसवरून स्टोर लोकेशन डेटा ऑटोमॅटीकली डिलीट करण्याचा एक पर्याय मिळणार आहे. युजर्सच्या गरजेनुसार त्यांचा लोकेशन डेटा मॅनेज करण्यासाठी गुगल ही सुविधा देणार आहे. 

गुगलचं हे नवीन ऑटोमॅटीक डेटा डिलीशन टूल युजर्स आपल्या स्मार्टफोनमध्ये जाऊन गुगल अकाऊंटच्या सेटींगमध्ये अ‍ॅक्सेस करू शकतात. या ठिकाणी डेटा जिलीट करण्यासंदर्भात काही पर्याय देण्यात आले आहेत. त्यापैकी आपला लोकेशन डेटा 3 महिने किंवा 18 महिन्यांपर्यंत ऑटोमॅटीक डिलीट करू इच्छित असतील तर त्याप्रमाणे पर्याय निवडा. तसेच जर युजर्सच्या अकाऊंटमध्ये 18 महिन्यांआधीचा काही डेटा उपलब्ध असेल तर तो डेटा ही डिलीट करण्याची सुविधा आहे. 

गुगलने या सर्विसबाबत दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर लोकेशन हिस्ट्री, वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटीचा स्टोअर केलेला डेटा देखील ऑटोमॅटीकली डिलीट करणार आहे. यासोबतच रिअल टाईम डिव्हाईस ट्रेकींगने स्टोर झालेले गुगल साइट्स, अ‍ॅप्स, गुगल सर्च, गुगल मॅप्स आणि गुगल फोटोज चा डेटा देखील ऑटोमॅटीकली डिलीट करणार आहे. हे फीचर अल्यानंतर युजर्सची गुगल सेटींगमध्ये वारंवार जाऊन लोकेशन हिस्ट्री आणि डेटा डिलीट करण्याच्या समस्येपासून सुटका होणार आहे.  या फीचरनंतर गुगल लोकेशन डेटा ट्रॅक करणार आहे मात्र आता युजर्स ते डिलीट करू शकणार आहेत. गुगलचं हे नवं फीचर लवकरच सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. 

गुगलकडे रेकॉर्ड आहे तुमचा आवाज; अशा डिलीट करा व्हॉईस कमांड्सगुगल असिस्टंटच्या मदतीने व्हॉईस कमांड्स देऊन अलार्म सेट करणं, हवामानाचा अंदाज घेणं किंवा घरातली इतर उपकरणं हाताळणं यासारखी कामंही करता येतात. हे सगळं करत असताना युजर्सची  सुरक्षितता महत्त्वाची असते. मात्र गुगलकडे युजर्सनी दिलेल्या सर्व कमांड्सचे रेकॉर्डिंग असते. गुगल प्रत्येक व्हॉईस कमांड रेकॉर्ड करत असतं आणि या सर्व कमांड सर्व्हरवर साठवून ठेवलेल्या असतात. गुगलने स्टोअर करून ठेवलेले सर्व रेकॉर्डींग हे युजर्स ऐकू शकतात. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवेत आवश्यक ते बदल करता यावेत यासाठी हा डाटा सेव्ह केला जातो. असं असलं तरी गुगल असिस्टंटवरील हिस्ट्री डिलीट करण्याचा पर्यायही युजर्सकडे उपलब्ध आहे. 

Google Chrome App वरही आता 'डार्क मोड'

गुगल काही दिवसांपासून आपल्या अ‍ॅप्ससाठी डार्क मोड फीचरची चाचणी करत होतं. त्यानंतर आता  गुगलने आपल्या युजर्ससाठी डार्क मोड हे फीचर आणले आहे. अ‍ॅन्ड्रॉईड क्रोम अ‍ॅपमध्ये हे फीचर लेटेस्ट स्टेबल अपडेट डाउनलोड करणाऱ्या युजर्सला उपलब्ध आहे. या बरोबरच गुगल आपल्या ब्राऊझरमध्ये नव्या रीडर मोडचीही चाचणी करत आहे. हे रीडर मोड सध्या डेस्कटॉप युजर्ससाठी क्रोम कॅनरीवर उपलब्ध आहे. रीडर मोडमध्ये गरज नसलेला सर्व कंटेंट निघून जाऊन फक्त आर्टिकल टेक्स्ट आणि फोटो पानावर दिसणार हे या फीचरचे वैशिष्ट्य आहे. या बरोबरच 'मॅन इन द मिडल' (MiTM) फिशिंग अ‍टॅक रोखण्यासाठी ब्राऊझर फ्रेमवर्क अद्ययावत करण्याचे गुगलचे काम सुरू आहे. गुगलच्या युजर्सला क्रोमच्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपवर डार्क मोडची मदतही मिळत आहे. हा मोड क्रोम v74 फॉर अ‍ॅन्ड्रॉईड रिलीजमध्ये उपलब्ध आहे. 

 

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान