शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

गुगल प्लस गेले, Shoelace आले; सोशल मीडियामुळे लोकांशी आलेला दुरावा घटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 12:52 IST

सोशल मीडियाने जग जवळ आले आहे. मात्र, लोकांमध्ये अंतरही खूप वाढले आहे.

गुगलनेफेसबुकमुळे ऑर्कुटला वाईट दिवस आल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा प्रस्थान बसविण्याचा प्रयत्न केला होता. Google+ लाँच करत गुगलनेफेसबुक, ट्विटरला धक्का द्यायचा प्रयत्न करूनही अपयश आल्याने गेल्यावर्षी गुगल प्लस बंद करण्यात आले होते. आता गुगलने पुन्हा नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणला असून थोडासा वेगळा विचार केला आहे. 

सोशल मीडियाने जग जवळ आले आहे. मात्र, लोकांमध्ये अंतरही खूप वाढले आहे. पूर्वी लोक एकमेकांना भेटत होते. आता सोशल मीडियामुळे दुरावले आहेत. ही खंत लक्षात घेऊन गुगलने हे शूलेस हे नवीन अ‍ॅप आणले आहे. या अ‍ॅपद्वारे खऱ्या आयुष्यात माणसे जोडण्यात येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. गुगलची टीम 120 ने हे अ‍ॅप बनविले आहे. 

या अॅपमध्ये तुमच्या खासगी आवड-निवडींवरून मित्र-मैत्रिणींचा शोध घेतला जातो. उदा. जर तुम्ही कोणत्याही नवीन शहरात राहायला गेला असाल आणि तेथे मित्र बनवू इच्छित असाल तर शूलेसच्या वापराने हे करता येणार आहे. Shoelace वेबसाईटनुसार या अ‍ॅपमध्ये खासगी आयुष्याचे भान ठेवण्यात आले आहे. हे अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर प्रत्येक युजरला कम्युनिटी जोडण्यासाठी सांगण्यात येते. यासाठी पडताळणीची गरज असते. हे अ‍ॅप सध्या अमेरिकेतच लाँच केले आहे आणि इन्व्हाईट केल्यानंतरच या सोशल मीडियावर जाता येणार आहे. 

हे अ‍ॅप अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरता येणार आहे. मात्र, त्यासाठी गुगलवर खाते असणे गरजेचे आहे. गुगल प्लस बंद केल्यानंतर हे नवीन अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. गुगल प्लसमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षेची कमतरता होती. 

टॅग्स :googleगुगलFacebookफेसबुक