आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करतो, कुठे जातो आणि कोणाशी बोलतो, यावर गुगलची तिसरी नजर सतत असते. सर्च इंजिन असो किंवा यूट्यूब, मॅप्स असो किंवा ईमेल; आपण कळत-नकळत आपला सगळा डेटा गुगलच्या हवाली करतो. तुम्हाला वाटत असेल की तुमची माहिती सुरक्षित आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. गुगलकडे तुमच्या प्रत्येक ऑनलाइन हालचालीचा रेकॉर्ड असतो. जर तुम्हाला तुमची प्रायव्हसी प्रिय असेल, तर गुगलच्या काही महत्त्वाच्या सेटिंग्समध्ये तातडीने बदल करणे आवश्यक आहे.
तुमच्या डेटावर गुगलचा ताबा
एकाच गुगल अकाउंटमुळे आपली अनेक कामे सोपी होतात, हे खरे असले तरी त्याचे धोकेही तितकेच मोठे आहेत. तुम्ही कोणत्या ठिकाणी भेट देता, कोणते व्हिडिओ पाहता आणि कोणाला मेल करता, ही सगळी माहिती गुगलच्या सर्व्हरवर साठवली जाते. प्रायव्हसीच्या दृष्टीने हा एक धोक्याचा इशारा आहे. मात्र, घाबरण्याचे कारण नाही; काही साध्या स्टेप्स वापरून तुम्ही तुमच्या डेटाचा ताबा पुन्हा मिळवू शकता.
प्रायव्हसी हवी असेल, तर 'या' सेटिंग्स करा बंद!
१. 'वेब अँड ॲप ॲक्टिव्हिटी' करा ऑफ: ही गुगलची सर्वात जास्त डेटा गोळा करणारी सेटिंग आहे. तुम्ही काय सर्च केले, कोणते ॲप्स वापरले आणि कोणत्या वेबसाइट्सवर गेलात, याची इत्थंभूत माहिती यात असते. यासाठी गुगलच्या 'My Activity' पेजवर जा. तिथे 'Web & App Activity' निवडा आणि ती 'Turn Off' करा. येथे 'Turn off and delete' पर्याय निवडून तुम्ही साठवलेला जुना डेटाही पुसून टाकू शकता.
२. लोकेशन हिस्ट्री आणि टाईमलाईन करा डिसेबल: गुगल मॅप्स तुमच्या फोनमधील लोकेशन सर्व्हिसचा वापर करून तुम्ही दिवसभरात कुठे-कुठे गेलात, याचा नकाशाच तयार करते. याला 'टाईमलाईन' म्हणतात. प्रायव्हसी जपण्यासाठी 'My Activity' पेजवर जाऊन 'Timeline' किंवा 'Location History' हे फिचर तातडीने बंद करा. यामुळे गुगलला तुमचा पाठलाग करता येणार नाही.
३. थर्ड-पार्टी ॲप्सचे कनेक्शन तोडा: अनेकदा आपण कोणत्याही नवीन ॲपमध्ये किंवा वेबसाइटवर लॉग-इन करताना 'Sign in with Google' हा सोपा पर्याय निवडतो. पण, यामुळे त्या अनोळखी ॲप्सना तुमच्या गुगल डेटाचा वापर करण्याची परवानगी मिळते. हे बंद करण्यासाठी तुमच्या गुगल अकाउंटच्या 'Security' टॅबमध्ये किंवा 'My Account' पेजवर 'Third-party connections' निवडा. तिथे तुम्हाला अशा सर्व ॲप्सची यादी दिसेल. ज्या ॲप्सची गरज नाही, त्यांचे कनेक्शन त्वरित 'Remove' करा. तुमच्या एका चुकीच्या क्लिकमुळे तुमची खासगी माहिती सार्वजनिक होऊ शकते, त्यामुळे वेळोवेळी या सेटिंग्स तपासा आणि सुरक्षित रहा.
Web Summary : Google tracks your online activity. Protect your privacy by disabling Web & App Activity, Location History, and revoking third-party app permissions in your Google account settings.
Web Summary : गूगल आपकी ऑनलाइन गतिविधि को ट्रैक करता है। वेब और ऐप गतिविधि, स्थान इतिहास को अक्षम करके और अपने Google खाते की सेटिंग में तृतीय-पक्ष ऐप अनुमतियों को रद्द करके अपनी गोपनीयता सुरक्षित रखें।