गुगलचं 'हे' लोकप्रिय मेसेजिंग अॅप 2020मध्ये होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 02:49 PM2018-12-03T14:49:03+5:302018-12-03T15:15:44+5:30

गुगलचं लोकप्रिय मेसेजिंग अॅप हँगआऊट्स हे 2020मध्ये बंद होण्याची शक्यता आहे. 9to5Googleने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे.

google hangouts will be shutting down sometime in 2020 report | गुगलचं 'हे' लोकप्रिय मेसेजिंग अॅप 2020मध्ये होणार बंद

गुगलचं 'हे' लोकप्रिय मेसेजिंग अॅप 2020मध्ये होणार बंद

Next
ठळक मुद्देगुगलचं लोकप्रिय मेसेजिंग अॅप हँगआऊट्स हे 2020मध्ये बंद होण्याची शक्यता आहे.2013 मध्ये गुगलने जी-चॅटच्या जागी हँगआऊट्स लाँच केलं होतं.हँगआऊट्स हा जीमेल वेबवर अजूनही चॅटिंगसाठी उत्तम पर्याय आहे.

नवी दिल्ली - गुगलचं लोकप्रिय मेसेजिंग अॅप हँगआऊट्स हे 2020मध्ये बंद होण्याची शक्यता आहे. 9to5Googleने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे. 2013मध्ये गुगलने जी-चॅटच्या जागी हँगआऊट्स लाँच केलं होतं. कंपनीने या अॅपमध्ये गेल्या काही वर्षांपासून अपडेट करणं बंद केलं आहे. तसेच मेसेजिंग सुविधाही बंद केली आहे. 

हँगआऊट्स हा जीमेल वेबवर अजूनही चॅटिंगसाठी उत्तम पर्याय आहे. जीमेलचे बहुतांश युजर्स हे अॅप वापरतात. गुगल प्ले स्टोरवर अजूनही हँगआऊट अॅप उपलब्ध आहे. गुगल हँगआऊट्स हे संवाद आणि संपर्काचं चांगलं माध्यम आहे. मेसेजिंग, व्हिडिओ चॅट, एसएमएस आणि व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल आदी फीचर्ससह ते कंपनीनं लाँच केलं होतं. 9to5Googleच्या एका अहवालानुसार, अनेक युजर्सनी हे अॅप आता जुने वाटू लागले आहे. तसेच अनेक बग्स येऊ शकतात असं म्हटलं आहे. 

Web Title: google hangouts will be shutting down sometime in 2020 report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल