शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Steve Irwin : 'क्रोकोडाइल हंटर' स्टीव्ह यांना गुगलचा डुडलरुपी सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 12:28 IST

ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना अनोखी मानवंदना दिली आहे.

ठळक मुद्देऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. स्टीव्ह इरविन यांना 'क्रोकोडाइल हंटर' या नावाने ओळखले जाते. जंगली प्राण्यांना सहज हाताळण्याच्या आपल्या कौशल्यामुळे स्टीव्ह अत्यंत लोकप्रिय झाले होते.गुगलने तयार केलेल्या आकर्षक डुडलमध्ये स्टीव्ह यांचे पशू-पक्ष्यांबद्दलचे प्रेम दाखवण्यात आले आहे. 

नवी दिल्ली - गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं.  गुगलने आज एक खास डुडल तयार करून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना अनोखी मानवंदना दिली आहे. 

स्टीव्ह इरविन यांना 'क्रोकोडाइल हंटर' या नावाने ओळखले जाते. जंगली प्राण्यांना सहज हाताळण्याच्या आपल्या कौशल्यामुळे स्टीव्ह अत्यंत लोकप्रिय झाले होते. पशू-पक्ष्यांशी त्यांची चांगली मैत्री होती. स्टीव्ह यांच्या सन्मानार्थ 15 नोव्हेंबर हा दिवस 'स्टीव्ह इरविन डे' म्हणून साजरा केला जातो. स्टीव्ह हे वन्यजीव संरक्षक, ऑस्ट्रेलियात झू-कीपर म्हणूनही कार्यरत होते. गुगलने तयार केलेल्या आकर्षक डुडलमध्ये स्टीव्ह यांचे पशू-पक्ष्यांबद्दलचे प्रेम दाखवण्यात आले आहे. 

स्टीव्ह यांचा जन्म मेलबर्नजवळील एसिडोनमध्ये 22 फेब्रुवारी 1962 रोजी झाला होता. स्टीव्ह यांचे वडील वन्यजीव तज्ज्ञ होते आणि त्यांना सरपटणाऱ्या प्राण्यांशी संबंधित हर्पेटोलॉजी विषयात विशेष आवड होती. त्यामुळे स्टीव्ह यांना देखील पशू-पक्ष्यांबद्दल आवड निर्माण झाली. डिस्कव्हरी, अ‍ॅनिमल प्लॅनेट, नॅशनल जिओग्राफिक टीव्ही चॅनेलवर इरविन यांचे शो असायचे. मगरींच्या जीवनाशी संबंधित 'क्रोको फाइल्स', 'द क्रोकोडाइल हंटर डायरीज' आणि 'न्यू ब्रीड वेट्स' आदी वाइल्डलाइफ डॉक्युमेंट्री स्टीव्ह यांनी पत्नी टेरी यांच्यासोबत केल्या आहेत. 

स्टीव्ह इरविन यांना मगरींविषयी विशेष प्रेम होते. त्यामुळेच ‘क्रोकोडाइल हंटर’ या नावाने ते प्रसिद्ध झाले. अनेक वन्यजीव, पशूंच्या नव्या प्रजातींचाही शोध त्यांनी लावला आहे. स्टीव्ह यांना दोन मुलं असून ते आता वडिलांचा वारसा पुढे चालवत आहेत. ‘द क्रोकोडाइल हंटर’ हा त्यांचा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय झाला. तसेच त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचले. 2006 मध्ये समुद्रातील जीवांवर आधारित एका अंडरवाटर शुटिंगच्या वेळी स्टिंग-रे या माशाने दंश केल्याने स्टीव्ह इरविन यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :googleगुगलDoodleडूडलAustraliaआॅस्ट्रेलिया