google chrome for android finally gets dark mode reader mode in testing phase | Google Chrome App वरही आता 'डार्क मोड'
Google Chrome App वरही आता 'डार्क मोड'

ठळक मुद्देगुगलने आपल्या युजर्ससाठी डार्क मोड हे फीचर आणले आहे. अ‍ॅन्ड्रॉईड क्रोम अ‍ॅपमध्ये हे फीचर लेटेस्ट स्टेबल अपडेट डाउनलोड करणाऱ्या युजर्सला उपलब्ध आहे. रीडर मोडमध्ये गरज नसलेला सर्व कंटेंट निघून जाऊन फक्त आर्टिकल टेक्स्ट आणि फोटो पानावर दिसणार हे या फीचरचे वैशिष्ट्य आहे.

नवी दिल्ली - गुगल काही दिवसांपासून आपल्या अ‍ॅप्ससाठी डार्क मोड फीचरची चाचणी करत होतं. त्यानंतर आता  गुगलने आपल्या युजर्ससाठी डार्क मोड हे फीचर आणले आहे. अ‍ॅन्ड्रॉईड क्रोम अ‍ॅपमध्ये हे फीचर लेटेस्ट स्टेबल अपडेट डाउनलोड करणाऱ्या युजर्सला उपलब्ध आहे. या बरोबरच गुगल आपल्या ब्राऊझरमध्ये नव्या रीडर मोडचीही चाचणी करत आहे. हे रीडर मोड सध्या डेस्कटॉप युजर्ससाठी क्रोम कॅनरीवर उपलब्ध आहे. 

रीडर मोडमध्ये गरज नसलेला सर्व कंटेंट निघून जाऊन फक्त आर्टिकल टेक्स्ट आणि फोटो पानावर दिसणार हे या फीचरचे वैशिष्ट्य आहे. या बरोबरच 'मॅन इन द मिडल' (MiTM) फिशिंग अ‍टॅक रोखण्यासाठी ब्राऊझर फ्रेमवर्क अद्ययावत करण्याचे गुगलचे काम सुरू आहे. गुगलच्या युजर्सला क्रोमच्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपवर डार्क मोडची मदतही मिळत आहे. हा मोड क्रोम v74 फॉर अ‍ॅन्ड्रॉईड रिलीजमध्ये उपलब्ध आहे. 

लेटेस्ट अपडेटची एपीके फाईल डाऊनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करत असताना अ‍ॅन्ड्रॉईड 8.1 आणि 9.0 अशा दोन्हीकडे काही एरर मेसेज दिसत आहे. गुगल डार्क मोड टॉगलला इनेबल करण्यासाठी युजरला आता अ‍ॅन्ड्रॉईड नाइट मोड फ्लॅग इनेबल करावा लागत असल्याने असे होत असण्याची शक्यता आहे. मात्र, आपल्या डिव्हाईसवर लेटेस्ट अपडेट एपीके फाइलद्वारे ते डाऊनलोड होते का यासाठी प्रयत्न करू शकतात. सर्वप्रथम डार्क मोड फीचर फेब्रुवारी महिन्यात पाहिले गेले होते. त्यावेळी त्या फीचरची चाचणी सुरू होती. त्यावेळी त्याची मॅक आणि अ‍ॅन्ड्रईड अशा दोन्हीसाठी चाचणी घेतली जात होती.

गुगलने पासवर्ड चेकअप क्रोम एक्स्टेंशन अ‍ॅड केले आहे. आता लवकरच ब्राऊझरमध्ये 'looklike URLs' हे फीचरही दिले जाण्याची शक्यता आहे. सर्च इंजिन गुगल नव्या Never Slow Mode वर देखील काम करत आहे. यामुळे क्रोम युजरला चांगले आणि जलद ब्राऊझिंगचा अनुभव मिळू शकणार आहे. हे फीचर रिसोर्स लोडिंग आणि रनटाइम प्रोसेसिंगला रोखत असल्याने वेबपेज जलदगतीने लोड होण्यास मदत होणार आहे. फिशिंग अटॅक रोखता यावेत यासाठी गुगल एंबडेड ब्राऊझर फ्रेमवर्कमधून लॉग-इन बंद करण्यासाठीही काम करत आहे. 

Facebook मेसेंजरमध्ये आलं डार्क मोड फीचर; अंधारात ठरणार फायदेशीर

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या मेसेंजर अ‍ॅपमध्ये 'डार्क मोड' फीचर सुरू करण्यात आले आहे. 2018 मध्ये डार्क मोड फीचरची चाचणी करण्यात आली होती. तांत्रिक कारणामुळे हे फीचर वापरताना युजर्सना काही अडचणींचा सामना करावा लागला होता. मेसेंजरमध्ये आलेले डार्क मोड फीचर युजर्सना एक वेगळा अनुभव देत आहे. मेसेंजर अ‍ॅपमध्ये डार्क मोड हे फीचर वापरण्यासाठी याआधी आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील एकाला मून इमोजी पाठवावी लागत होती. नोटिफिकेशन आल्यानंतर 'डार्क मोड' अनलॉक होत असे. आता सर्वच युजर्ससाठी 'डार्क मोड' सुरू करण्यात आले आहे. फेसबुकने हे खास फीचर सर्वांसाठी सुरू केले असून यासाठी कोणताही मेसेज अथवा इमोजी पाठवण्याची आवश्यकता नाही. 

युजर्सना डार्क मोड हे फीचर ऑन करायचे असल्यास मेसेंजर अ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन उजव्या बाजूला असणाऱ्या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. 'डार्क मोड' हे फीचर डोळ्यांसाठी देखील चांगले आहे. त्याशिवाय काळा डिस्प्ले असल्यामुळे मोबाइल बॅटरी कमी खर्च होते. जर तुम्हाला अ‍ॅपमध्ये 'डार्क मोड'चा पर्याय दिसत नसेल तर अ‍ॅप अपडेट करावे लागणार आहे. रात्रीच्यावेळी काळोखात चॅटींग केल्यास डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यावर उपाय म्हणून फेसबुक मेसेंजर अ‍ॅपने डार्क मोड फीचर आणले आहे.


 


Web Title: google chrome for android finally gets dark mode reader mode in testing phase
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.