new dark mode rolled out for all facebook messenger | Facebook मेसेंजरमध्ये आलं डार्क मोड फीचर; अंधारात ठरणार फायदेशीर
Facebook मेसेंजरमध्ये आलं डार्क मोड फीचर; अंधारात ठरणार फायदेशीर

ठळक मुद्देसोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या मेसेंजर अ‍ॅपमध्ये 'डार्क मोड' फीचर सुरू करण्यात आले आहे. युजर्सना डार्क मोड हे फीचर ऑन करायचे असल्यास मेसेंजर अ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन उजव्या बाजूला असणाऱ्या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. 'डार्क मोड' हे फीचर डोळ्यांसाठी देखील चांगले आहे. त्याशिवाय काळा डिस्प्ले असल्यामुळे मोबाइल बॅटरी कमी खर्च होते.

नवी दिल्ली - सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या मेसेंजर अ‍ॅपमध्ये 'डार्क मोड' फीचर सुरू करण्यात आले आहे. 2018 मध्ये डार्क मोड फीचरची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर मार्च महिन्यात युजर्सना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक कारणामुळे हे फीचर वापरताना युजर्सना काही अडचणींचा सामना करावा लागला होता. मेसेंजरमध्ये आलेले डार्क मोड फीचर युजर्सना एक वेगळा अनुभव देत आहे. 

मेसेंजर अ‍ॅपमध्ये डार्क मोड हे फीचर वापरण्यासाठी याआधी आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील एकाला मून इमोजी पाठवावी लागत होती. नोटिफिकेशन आल्यानंतर 'डार्क मोड' अनलॉक होत असे. आता सर्वच युजर्ससाठी 'डार्क मोड' सुरू करण्यात आले आहे. फेसबुकने हे खास फीचर सर्वांसाठी सुरू केले असून यासाठी कोणताही मेसेज अथवा इमोजी पाठवण्याची आवश्यकता नाही. 

युजर्सना डार्क मोड हे फीचर ऑन करायचे असल्यास मेसेंजर अ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन उजव्या बाजूला असणाऱ्या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. 'डार्क मोड' हे फीचर डोळ्यांसाठी देखील चांगले आहे. त्याशिवाय काळा डिस्प्ले असल्यामुळे मोबाइल बॅटरी कमी खर्च होते. जर तुम्हाला अ‍ॅपमध्ये 'डार्क मोड'चा पर्याय दिसत नसेल तर अ‍ॅप अपडेट करावे लागणार आहे. रात्रीच्यावेळी काळोखात चॅटींग केल्यास डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यावर उपाय म्हणून फेसबुक मेसेंजर अ‍ॅपने डार्क मोड फीचर आणले आहे.

गेमिंग लव्हर्ससाठी खूशखबर, फेसबुकने लाँच केला Gaming Tab

फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुकने यावेळी गेमिंग लव्हर्स युजर्ससाठी एक Gaming Tab लाँच केला आहे. फेसबुकच्या मेन नेविगेशन पेजवर युजर्सना आता एक वेगळं सेक्शन दिसणार आहे. यामुळे युजर्स गेमिंग पेजवर थेट जाऊ शकणार आहेत. गेमिंग पेजवर युजर्सना अनेक इंटरेस्टिंग गेमचे ऑप्शन देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे गेम्स युजर्सना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळता येणार आहेत. Gaming Tab वर युजर्सना गेम्सचे लोकप्रिय ग्रुप्स फॉलो करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच या नव्या टॅबमध्ये युजर्स आपल्या आवडीने गेम्स निवडून अनेक नवीन कॉन्टॅक्ट शोधू शकतात. 

फेसबुकवरून व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टालाही मॅसेज पाठविता येणार...

गुगलच्या ऑर्कुटसारखी फेसबुकची स्थिती होऊ नये म्हणून फेसबुक कंपनी नवनवीन फीचर आणत असतं. आता फेसबुकवरून इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही मॅसेज पाठविता येणार आहेत. ही सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवरूनही फेसबुकला मॅसेज पाठविण्यासाठी मिळणार आहे. खरंतर फेसबुक त्याच्या मालकीच्या या तिन्ही प्लॅटफॉर्मला एकमेकांना जोडण्याची तयारी करत आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार ही कल्पना मार्क झुकरबर्ग यांना सुचली आहे. या तिन्ही प्लॅटफॉर्मच्या अ‍ॅपचा वापर बदलणार नसून केवळ एकमेकांना क्रॉस प्लॅटफॉर्मवर मॅसेज पाठविता येणार आहेत. 

Facebook वर लवकरच येणार Whatsapp सारखं फीचर

Facebook आणि Whatsapp नेहमीच युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतात. Whatsapp वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या नव्या फीचर पर्यायाला युजर्सची चांगलीच पसंती मिळाली. Whatsapp सारखाच हा पर्याय लवकरच फेसबुकमध्येही दिसणार आहे. फेसबुक लवकरच Facebook Messenger वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या पर्यायाचे फीचर सुरू करणार आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सना 'डिलीट फॉर एवरीवन' हा पर्याय मिळणार आहे. सध्या फेसबुकवर या फीचरची चाचणी करण्यात येत आहे.

Facebook अकाऊंट दुसरं कोणी लॉग इन करेल याची भीती वाटते?; 'हे' फीचर करणार अलर्ट

फेसबुक युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुक काही वेळा चुकून लॉग इन राहीलं तर अनेकदा त्याचा चुकाचा वापर केला जाण्याची शक्यता ही अधिक असते. मात्र फेसबुकमध्ये एक असं फीचर आहे ज्याच्या मदतीने युजर्स अकाऊंट सुरक्षित ठेवू शकतात. Facebook च्या सेटिंग में Extra Security देण्यासाठी युजर्सना एक फीचर देण्यात आले आहे.

- फेसबुकने दिलेले हे फीचर अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी सर्वप्रथम आपलं फेसबुक अकाउंट ओपन करा. 

- ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा. 

- क्लिक केल्यानंतर सेटींगचा एक पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यास एक नवं पेज ओपन होईल. 

- मल्टीपल ऑप्शन त्यामध्ये देण्यात आलेले असतील. त्यातील  Security & Login वर जा.

- थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर ‘Setting Up Extra Security’ चा एक पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा. 

-  ‘Get Alerts about unrecognized logins’ हा पर्याय दिसेल. तसेच त्याच्यासमोर Edit चे बटण असणार आहे. 

- पर्यायावर क्लिक केल्यानंतर तेथे ‘Notification’, ‘Messenger’ आणि ‘Email’ हे तीन पर्याय दिसतील. 

- तिन्ही पर्यायासमोर ‘Get Notifiation’ आणि ‘Don’t Get Notifiation’ असे आणखी दोन पर्याय दिसतील.  

- यामध्ये युजर्सना  ‘Get Notifiation’ वर टिक करून Enable करावं लागेल. त्यानंतर Save Changes वर क्लिक करा.

फेसबुक संदर्भातील ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीने तुमचं फेसबुक अकाऊंट लॉग इन केलं तर तुम्हाला त्याबाबत अलर्ट दिला जाईल.  


Web Title: new dark mode rolled out for all facebook messenger
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.