शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

सावधान!; फ्री किंवा ओपन इंटरनेट वापरणाऱ्यांना खुद्द सुंदर पिचाईंनीच सांगितला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 15:25 IST

Google CEO Sundar Pichai Warns: आर्टिफिशीअल इंटेलिजंस महत्वाचे आणि क्रांतीकारी तंत्रज्ञान आहे

ठळक मुद्दे मी अमेरिकन नागरिक असलो तरी अंत:करणात भारतच

सिलीकॉन व्हॅली: गुगल(Google) चे मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) सुंदर पिचाई(Sundar Pichai) यांनी यूजर्सला मोठा इशारा दिला आहे. कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅली येथील Google मुख्यालयात BBC ला ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जगभरातील फ्री आणि ओपन सोर्स इंटरनेटवर सायबर हल्ल्याचा धोका वर्तवला आहे.

यावेळी ते म्हणाले, अनेक देशात फ्री किंवा ओपन सोर्स इंटरनेटवर सायबर हल्ले होत आहेत. पण, हे देश इतर देशांपर्यंत माहिती पोहचवण्यास उशीर करत असल्याने इतर देशांनाही याचा धोका वाढला आहे. तसेच, चीनच्या पाळत ठेवणाऱ्या इंटरनेट मॉडेलविषयी विचारले असता, त्यांनी थेट चीनचे नाव घेणे टाळले. पण, गुगलचे कोणतेच प्रमुख प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेजचीनमध्ये चीनमध्ये उपलब्ध नसल्याचे सांगितले. याशिवाय त्यांनी यूजर्सना टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन(Two-factor authentication) करण्यासही सांगितले. 

मोबाईल कितीवेळ वापरावा ?यावेळी सुंदर पिचाई यांनी मुलांसाठीचा स्क्रीन टाइम, पासवर्ड कधी आणि किती लवकर बदलायला हवा आणि ते किती मोबाइल वापरतात, यावरही भाष्य केले. त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही मुलांना कितीवेळ मोबाईल पाहू देता? ते म्हणाले की, मोबाईल कितीवेळ वापरावा, हे मी मुलांनाच ठरवू देतो. मोबाईल ही वयक्तिक बाब आहे आणि तो वापरणाऱ्याने याचा वापर कसा करायचा, हे ठरवावे. 

पिचाई वापरतात 20 फोनयावेळी पिचाई यांना त्यांच्या फोनची संख्या विचारण्यात आली. तेव्हा ते म्हणाले की, मी सध्या 20 पेक्षा जास्त फोनचा वापर करतो. मी सतत फोन बदलत असतो. नवनवीन फोनची माहिती घेत असतो. तसेच, त्यांना आर्टिफिशीअल इंटेलिजंस(Artificial intelligence)बद्दल विचारण्यात आले असता. ते म्हणाले, हे तंत्रज्ञान माणसाने तयार केले आहे. हे एक महत्वाचे आणि क्रांतीकारी तंत्रज्ञान आहे. याची तुलना विज किंवा इंटरनेटसारख्या गोष्टींसोबत करता येईल. मी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला सर्वात ताकदवान तंत्रज्ञानाच्या रूपात पाहतो. 

मी अमेरिकन नागरिक असलो तरी अंत:करणात भारतचपिचाई यांनी यावेळी आपण आज जे काही आहोत त्यात भारताचा मोठा वाटा असल्याचे वक्तव्य केले. मी एक अमेरिकन नागरिक आहे, परंतु आजही माझ्या अंत:करणात भारत आहे. यामुळेच आज मी जे काही आहे त्यात भारताचा मोठा वाटा आहे, असे सुंदर पिचाई म्हणाले. 

क्वॉन्टम कंप्यूटिंगमुळे बदल घडेलसुंदर पिचाई यांनी सांगितल्यानुसार, क्वॉन्टम कंप्यूटिंग पूर्णपणे एक वेगळी कल्पना आहे. ही सामान्य कंप्यूटिंग बायनरीवर आधारीत आहे किंवा यांना बिट्स म्हणता येईल. क्वॉन्टम कंप्यूटर क्यूबिट्सवर काम करते. यामुळे एक पदार्थ एकाचवेळी अनेक स्टेट्समध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला इतक्या लवकर समजणे अवघड आहे, पण येणाऱ्या काळात यामुळे क्रांती नक्की घडेल, असे मत त्यांनी मांडले.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयtechnologyतंत्रज्ञानgoogleगुगलSundar Pichaiसुंदर पिचईcyber crimeसायबर क्राइमInternetइंटरनेटAmericaअमेरिकाCaliforniaकॅलिफोर्निया