शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Chipko Movement: गुगलने डुडलमधून दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 12:14 IST

गुगलने आज डुडलच्या माध्यमातून भारतातील प्रसिद्ध चिपको आंदोलनाची आठवण काढली आहे.

मुंबई- गुगलने आज डुडलच्या माध्यमातून भारतातील प्रसिद्ध चिपको आंदोलनाची आठवण काढली आहे. आज या आंदोलनाला ४५ वर्षे झाली. जंगल वाचवण्यासाठी खेड्यातील महिलांनी अनोख्या पद्धतीनं लढवलेल्या या आंदोलनाची दखल गुगलनं घेतली असून डुडलच्या माध्यमातून संपूर्ण जगापर्यंत हे आंदोनल पोहोचविण्यासाठी डुडल साकारण्यात आलं आहे. गुगलने बनवलेल्या डुडलमध्ये एका झाडांच्या भोवती चारही बाजुंनी महिलांनी हातात हात देत गोल मानवी साखळी बनवलेली दिसत आहे. झाडाला तोडण्यापासून वाचविण्यासाठी या महिला झाडांना चिकटून उभ्या आहेत. 

संपूर्ण भारतात जंगल वाचवण्यासाठी लोकांनी शांततेचा मार्ग अवलंबला होता. ज्या ठिकाणी ठेकेदार झाडांची कत्तल करण्यासाठी जात त्या ठिकाणी चिपको आंदोलनकर्ते झाडांना मिठी मारत 'चिपको आंदोलन' करत असत. झाडांची कत्तल रोखण्यासाठी केलेलं आंदोलन हे महात्मा गांधींच्या अहिंसा धोरणावर आधारित होतं. गौरा देवी यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. गौरा देवी यांना पुढे 'चिपको वुमन' या नावानेही ओळखलं जायचं.

कशी झाली आंदोलनची सुरूवात?चिपको आंदोलनाची सुरूवात पर्यावरण वाचविण्यासाठी झाली. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यापासून याची सुरूवात झाली. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील अलकनंदा घाटीच्या मंडल गावातील लोकांनी हे आंदोलन सुरू केलं. 1973मध्ये वन विभागाच्या ठेकेदारांनी जंगलाचील झाडं कापायला सुरूवात केली. त्याचवेळी चिपको आंदोलन उदयास आलं. या आंदोलनात भाग घेणाऱ्यांमध्ये गौरा देवी यांच्याशिवाय धूम सिंह नेगी, बचनी देवी आणि सुदेशा देवी यांचांही सहभाग आहे. गांधीवादी सुधारक सुंदरलाल बहुगुणा यांनीही या आंदोलनाला दिशा दिली.  गांधीवादी सुधारक सुंदरलाल बहुगुणा यांनी या आंदोलनाला दिशा दिली होती. व याची दखल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना घ्यावी लागली होती. आज या सर्व आंदोलनाला उजाळा देण्यासाठी गुगलने 'डुडल' बनवले आहे.  

टॅग्स :googleगुगलDoodleडूडल