शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Gaming च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; Airtel 5G ठरणार गेमर्ससाठी उत्तम पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 12:39 IST

Airtel 5G Gaming Experience : गेल्या काही वर्षांमध्ये गेमिंग इंडस्ट्री आणि तंत्रज्ञान खूप बदलले आहे.

ठळक मुद्देगेल्या काही वर्षांमध्ये गेमिंग इंडस्ट्री आणि तंत्रज्ञान खूप बदलले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये गेमिंग इंडस्ट्री आणि तंत्रज्ञान खूप बदलले आहे. काही वर्षांपूर्वी सुपर मारिओ (Super Mario) आणि कॉन्ट्रासारखे (Contra) गेम्स एकाच कार्ट्रेजमध्ये येत होते. परंतु आता त्यांची जागा हाय क्वालिटी आणि मोठ्या ग्राफिक्स असलेल्या गेम्सनं घेतली आहे. हे परिवर्तन कम्प्युटर गेम्सपासून गेमिंग कन्सोलसारख्या प्लेस्टेशन एक्सबॉक्स पर्यंत आलं आहे. सध्या याची जागा आता स्मार्टफोन्सनं घेतली आहे. आज गेमिंग हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही, तर याकडे एक उत्तम करिअर म्हणूनही पाहिलं जात आहे.

सध्याच्या काळात अनेक गेमर्स ऑनलाइन स्ट्रीमिंग करतात. यासाठी उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि हाय स्पीड इंटरनेटची आवश्यकता असते. आज भारत हा संपूर्ण जगात सर्वात मोठा गेमिंग हब आहे. याशिवाय देशात गेमिंग इन्फ्रास्ट्रक्चर तेजीनं वाढत आहे. अशातच आगामी काळात येणारं 5G तंत्रज्ञान यामध्ये मोठं परिवर्तन करेल असंही म्हटलं जात आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी एअरटेलनं हे शक्य करून दाखवलं आहे. एअरटेलनं नुकतंच मानेसरमध्ये 5G लाईव्ह टेस्ट नेटवर्कवर क्लाऊ़ड गेमिंग डेमो सेशनचं आयोजन केलं होतं. याच्या निकालानं भविष्यातील अनेक मार्ग खुले केले आहेत.

कसा होता परफॉर्मन्स?क्लाऊड गेमिंगचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी एअटेलनं देशातील टॉप गेमर सलमान अहमद ज्याला माम्बा आणि नमन माथूर ज्याला मॉर्टल या नावानं ओळखलं जातं त्याला बोलावण्यात आलं होतं. त्यांच्या स्मार्टफोन्सना 3500 मेगाहर्ट्स कॅपेसिटीच्या स्पेक्ट्रम बँडशी कनेक्ट करण्यात आलं. त्यांना एअरटेल 5G वर 1 GBPS पेक्षा अधिक स्पीड आणि 10 मिलीसेकंदाची लेटेन्सी मिळाली. दोघांनीही हा स्मार्टफोन गेमिंग एक्सपिरिअन्स हाय एन्ड पीसी आणि कन्सोल गेमिंगसारखा असल्याचं म्हटलं. कोणत्याही लॅगिंग शिवाय गेमिंग, लेटेन्सी आणि पिंगच्या 5G प्रत्येक गेमरचं स्वप्न बनेल आणि संपूर्ण भारतात ते लाँच होण्याची वाट पाहत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. क्लाऊड गेमिंगद्वारे कोणत्याही अतिरिक्त हार्डवेअर शिवाय अथवा गेम डाऊनलोड करता डिजिटल बॅटलग्राउंडचा आनंद घेता येतो.

टॅग्स :AirtelएअरटेलIndiaभारतonlineऑनलाइनtechnologyतंत्रज्ञान