BSNL वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! Jio, Airtel च्या 4G नेटवर्कचा वापर करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 19:08 IST2025-01-21T19:07:18+5:302025-01-21T19:08:33+5:30

बीएसएनएल वापरकर्ते जिओ आणि एअरटेलच्या 4G नेटवर्कवरून कॉल करू आणि संदेश पाठवू शकतील.

Good news for BSNL users Can use Jio and Airtel's 4G network | BSNL वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! Jio, Airtel च्या 4G नेटवर्कचा वापर करता येणार

BSNL वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! Jio, Airtel च्या 4G नेटवर्कचा वापर करता येणार

बीएसएनएल वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मोबाईल वापरकर्त्यांचा कनेक्टिव्हिटी अनुभव सुधारण्यासाठी, दूरसंचार विभागाने एक नवीन फिचर सुरू केले आहे. आता जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल वापरकर्ते नेटवर्कशिवाय कॉल करू शकतील. देशातील सर्व टेलिकॉम टॉवर्समध्ये सुरू करण्यात आलेल्या इंट्रा सर्कल रोमिंग सेवेच्या मदतीने हे शक्य होईल.

ही सेवा ग्रामीण आणि दुर्गम भागात फायदेशीर ठरेल, तिथे लोकांना कनेक्टिव्हिटीच्या अभावामुळे समस्यांना तोंड द्यावे लागते. 

तासांचे अंतर मिनिटांत पार होणार, ऑटो एक्स्पोमध्ये लाँच झाली देसी एअर टॅक्सी'शून्य'; ६ जण प्रवास करणार

वापरकर्ते फक्त त्यांच्या विशिष्ट टेलिकॉम ऑपरेटरद्वारे चालवल्या जाणाऱ्या टॉवर्सच्या मदतीने ही सेवा मिळवू शकत होते, पण आता ICR सुविधेसह, जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल ग्राहक अखंड कनेक्टिव्हिटीसाठी DBN-निधीत टॉवर्स वापरू शकतात. 

जर तुम्ही अशा ठिकाणी गेलात जिथे बीएसएनएल टॉवर नाही आणि एअरटेलची सेवा चांगली आहे तर तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. हे DBN समर्थित टॉवर्सद्वारे शक्य होऊ शकते.

ही सेवा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुरू केली आहे. यासोबतच, संचार साथी मोबाईल अॅप आणि राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन २.० देखील लाँच करण्यात आले आहे. या सुविधेमुळे, दूरसंचार कंपन्यांना प्रत्येक भागात त्यांचे टॉवर बसवण्याची आवश्यकता राहणार नाही. या उपक्रमामुळे टीएसपींना ऑपरेशनल खर्चात बचत होईल आणि त्याचबरोबर त्यांच्या ग्राहकांना सिग्नलच्या कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही याची खात्री होईल.

दूरसंचार विभागाच्या आकडेवारीनुसार, ही योजना भारतातील ३५,४०० हून अधिक गावांमध्ये २७,००० DBN-निधीत टॉवर्सद्वारे 4G कव्हरेज देईल.

ग्रामीण कनेक्टिव्हीटीमध्ये सुधारणा

ICR सुविधेबाबत बोलताना  सिंधिया यांनी वापरकर्त्यांना चांगली सेवा देण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण आणि दुर्गम भागात सेवा देण्यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, बीएसएनएल, एअरटेल आणि जिओ या तीन प्रमुख दूरसंचार कंपन्यांमधील हे सहकार्य डीबीएन-निधी असलेल्या साइट्सचा फायदा घेत आहे.

दूरसंचार कायदा २०२३ अंतर्गत स्थापन झालेला DBN हा भारत सरकारने कमी सेवा असलेल्या क्षेत्रांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी तयार केलेला निधी आहे.

Web Title: Good news for BSNL users Can use Jio and Airtel's 4G network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.