शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

जिओनी एस १० लाईट : जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Published: December 26, 2017 9:02 AM

जिओनी कंपनीने आपले एस १० लाईट हे मॉडेल लाँच केले असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

जिओनी कंपनीने या वर्षी मे महिन्यात एस १० लाईट हा चार कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला होता. हे मॉडेल अद्याप भारतात सादर करण्यात आले नाही. तथापि, आता याची ‘लाईट’ या नावाने नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. अर्थात यात आधीच्या मॉडेल्सच्या तुलनेत थोडे कमी फिचर्स आहेत. जिओनी एस १० लाईट या मॉडेलमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला नाही. यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी  एलईडी फ्लॅशसह १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यात अद्ययावत फेसियल इनहान्समेंट प्रणाली दिलेली आहे. याच्या मदतीने फेस डिटेक्शन करून त्यावर तात्काळ प्रक्रिया करता येते. तर यात ड्युअल टोन एलईडी फ्लॅश, पीडीएएफ आणि एफ/२.० अपार्चरसह १३ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

जिओनी एस १० लाईट या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात स्प्लीट स्क्रीन आणि आय प्रोटेक्शन मोड प्रदान करण्यात आले आहेत. क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन ४२७ प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या स्मार्टफोनची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी इतके असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा देण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडपासूनन विकसित करण्यात आलेल्या अमिगो ओएस ४.० या प्रणालीवर चालणारे आहे. या इंटरफेसमुळे अ‍ॅप लॉक, प्रायव्हेट स्पेस आदी सुविधा मिळतील. सर्वात महत्वाचे म्हणजे या स्मार्टफोनवर एकचदा तीन व्हाटसअ‍ॅप अकाऊंट वापरता येणार आहेत.

जिओनी एस १० लाईट या मॉडेलमध्ये ३१०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. हा स्मार्टफोन ग्राहकांना 15 हजार 999 रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. दरम्यान, हा स्मार्टफोन खरेदी करणार्‍यांना पेटीएम आणि जिओने काही ऑफर्सदेखील दिल्या आहेत. यात पेटीएम मॉलवरून ३५० रूपयांपेक्षा जास्त खरेदी करणार्‍या ग्राहकांना ५० कॅशबॅक मिळणार आहेत. तर जिओच्या ग्राहकांना ३०९ वा त्यापेक्षा जास्तच्या रिचार्जवर १० महिन्यांपर्यंत दरमहा ५ जीबी अतिरिक्त डाटा मिळणार आहे.

टॅग्स :Gioneeजिओनीtechnologyतंत्रज्ञान