BSNL द्वारे ऑनलाइन मिळवू शकता VIP किंवा Fancy मोबाईल नंबर, जाणून घ्या स्टेप्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 13:36 IST2025-02-13T13:35:44+5:302025-02-13T13:36:11+5:30

BSNL Fancy Numbers : फॅन्सी नंबर देण्यासाठी बीएसएनएलकडून एक सर्व्हिस दिली जाते.

get bsnl fancy or vip numbers online check steps  | BSNL द्वारे ऑनलाइन मिळवू शकता VIP किंवा Fancy मोबाईल नंबर, जाणून घ्या स्टेप्स...

BSNL द्वारे ऑनलाइन मिळवू शकता VIP किंवा Fancy मोबाईल नंबर, जाणून घ्या स्टेप्स...

BSNL Fancy Numbers : गेल्या वर्षी जिओ, एअरटेल आणि व्हीआय सारख्या खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या. मात्र, सरकारी कंपनी बीएसएनएलने आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या नव्हत्या. त्यामुळे खाजगी कंपन्यांकडून बीएसएनएलमध्ये पोर्ट करणाऱ्या लोकांची संख्या अचानक वाढली. 

अजूनही बरेच लोक बीएसएनएलमध्ये आपले नंबर पोर्ट करत आहेत. जर तुम्हीही बीएसएनएलमध्ये सामील होण्याचा विचार करत असाल आणि स्वतःसाठी फॅन्सी नंबर किंवा व्हीआयपी फोन नंबर हवा असेल, तर तो कसा खरेदी करावा, यासंदर्भात जाणून घ्या...

फॅन्सी नंबर देण्यासाठी बीएसएनएलकडून एक सर्व्हिस दिली जाते. Choose Your Mobile Number(CYMN) या नावाने ही सर्व्हिस दिली जाते. पूर्वी ही सुविधा लिमिटेड सर्कलमध्ये मिळत होती आणि आता ही सुविधा सर्वांना उपलब्ध करण्यात आली आहे. बीएसएनएलद्वारे ऑनलाइन फॅन्सी नंबर मिळविण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करता येईल.

अशा प्रकारे फॅन्सी नंबर मिळवू शकता
- पहिल्यांदा तुम्हाला http://cymn.bsnl.co.in/ या लिंकवर जाऊन कंपनीची वेबसाइट उघडावी लागेल.
- ही सर्व्हिस कुठे घ्यायची आहे, त्यासाठी तुम्हाला झोन आणि राज्य निवडावे करावे लागेल.
- यानंतर, तुम्हाला एक टेबल दिसेल जिथे सर्व नंबर उपलब्ध असतील. येथे तुम्हाला दोन कॉलम मिळतील. यामध्ये पहिला पर्याय तुम्हाला चॉइस नंबर निवडण्याची परवानगी देईल आणि दुसरा पर्याय तुम्हाला फॅन्सी नंबर निवडण्याची परवानगी देईल.
- येथे तुम्हाला तुमच्या आवडीचा नंबर निवडावा लागेल. यासाठी तुम्हाला सीरिज, स्टार्ट नंबर, एंड नंबर आणि सम ऑफ ग नंबर्स (Sum of the numbers) असे पर्याय देखील मिळतील.
- आता, तुम्हाला नंबर निवडायचा आहे आणि रिझर्व्ह नंबर पर्याय निवडावा लागेल.
- त्यानंतर, मेसेजद्वारे पिन मिळविण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
- त्यानंतर, ग्राहकाला ऑपरेटर कस्टमर केअर किंवा सर्व्हिस ब्रांचशी संपर्क साधावा लागेल. 
- एकदा हे पूर्ण झाले की, युजर्सना फॅन्सी नंबरसाठी पैसे द्यावे लागतील आणि सर्व फॉर्मेलिटी पूर्ण करावी लागेल.

फॅन्सी नंबर निवडीसाठी मार्गदर्शक तत्त्वे...
युजर्सना फक्त एकच नंबर निवडण्याची परवानगी आहे. दुसरे म्हणजे, युजर्सना एकाच वेळी फॅन्सी नंबरसाठी पैसे द्यावे लागतात. ही योजना फक्त GSM नंबर ग्राहकांसाठी आहे. ग्राहकांना मेसेजद्वारे सात अंकी पिन मिळेल, जो चार दिवसांसाठी व्हॅलिड असेल आणि किंमत सुद्धा फिक्स्ड आहे. दरम्यान, व्होडाफोन- आयडिया, एअरटेल आणि रिलायन्स जिओ सारखे इतर ऑपरेटर देखील आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रक्रियांसह व्हीआयपी नंबर देतात.

Web Title: get bsnl fancy or vip numbers online check steps 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.