शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

SonyLIV च्या सब्सस्क्रिप्शनसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे! मोफत बघा चित्रपट आणि वेब सीरिज  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 10:36 AM

Vodafone Idea नं सादर केलेल्या नव्या रिचार्ज प्लॅन सोबत SonyLIV चं सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे.  

Vodafone Idea नं आपला नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची खासियत म्हणजे यासोबत SonyLIV चं सब्सस्क्रिप्शन मोफत मिळेल. तसेच डेटा देखील मोफत देण्यात येत आहे. हा एक अ‍ॅड-ऑन पॅक आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या मुख्य प्लॅन सोबत जास्त डेटा हवा असेल तर तुम्ही या रिचार्जचा वापर करून अतिरिक्त डेटा मिळवू शकता.  

Vodafone Idea Rs 82 Prepaid Plan 

Vi (Vodafone Idea) च्या प्लॅनची किंमत 82 रुपये ठेवण्यात आली आहे. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 4GB डेटा मिळतो. हा एक अ‍ॅड-ऑन पॅक असल्यामुळे तुम्ही या रिचार्ज प्लॅनचा वापर तुम्ही अतिरिक्त डेटा मिळवण्यासाठी करू शकता. परंतु फक्त डेटा बेनिफिट्ससाठी सादर करण्यात आला नाही. सोबत ओटीटी सब्सस्क्रिप्शन देखील मिळतं. या प्लॅनमध्ये एकूण 14 दिवसांची वैधता देखील मिळते. परंतु ओटीटी सब्सस्क्रिप्शनची वैधता वेगळी आहे.  

सोनीलिव सब्सस्क्रिप्शन  

वोडाफोन आयडियाच्या 82 रुपयांच्या प्लॅन सोबत SonyLIV प्रीमियम सब्सस्क्रिप्शन मोफत देण्यात येत आहे. या सब्सस्क्रिप्शनची वैधता 28 दिवस असेल. SonyLIV प्रीमियम युजर्सना प्लॅटफॉर्मवरील Scam 1992, Maharani सह अन्य लोकप्रिय वेब सीरीज बघता येतील. या सब्सस्क्रिप्शनचा वापर फक्त मोबाईलवरून करता येईल, त्यामुळे स्मार्ट टीव्ही किंवा लॅपटॉपवर हा कंटेंट बघता येईल.  

याबरोबरीनेच ‘वी’ने आपल्या ग्राहकांसाठी ‘वी’ ऍपवर वी मुव्हीज अँड टीव्हीवर (व्हीएमटीव्ही) आकर्षक कंटेंटचा भरपूर मोठा, वैविध्यपूर्ण साठा उपलब्ध करवून दिला आहे. व्हीएमटीव्ही ऍपवर 450 पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, लाईव्ह न्यूज चॅनेल्स तसेच इतर ओटीटी ऍप्सवरील प्रीमियम कंटेंट पाहता येतो. 

टॅग्स :Vodafoneव्होडाफोन