प्लास्टिक नव्हे तर स्टेनलेस स्टीलच्या फ्रेमसह भन्नाट स्मार्टवॉच लाँच, खोल पाण्यात देखील सांगणार हार्ट रेट  

By सिद्धेश जाधव | Updated: April 6, 2022 16:00 IST2022-04-06T16:00:24+5:302022-04-06T16:00:56+5:30

Fossil Skagen Falster Gen 6 स्मार्टवॉच 42mm स्टेनलेस स्टील फ्रेमसह भारतात लाँच झालं आहे.  

Fossil Skagen Falster Gen 6 Premium Smartwatch Launched In India   | प्लास्टिक नव्हे तर स्टेनलेस स्टीलच्या फ्रेमसह भन्नाट स्मार्टवॉच लाँच, खोल पाण्यात देखील सांगणार हार्ट रेट  

प्लास्टिक नव्हे तर स्टेनलेस स्टीलच्या फ्रेमसह भन्नाट स्मार्टवॉच लाँच, खोल पाण्यात देखील सांगणार हार्ट रेट  

Fossil नं भारतात आपला प्रीमियम स्मार्टवॉच Skagen Falster Gen 6 लाँच केलं आहे. हे स्मार्टवॉच 34 ATM वॉटर रेसिस्टेंट रेटिंगसह बाजारात आलं आहे. यात SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर आणि स्टेप कॉउंटर, असे हेल्थ फीचर्स मिळतात. कंपनीनं यात 42mm स्टेनलेस स्टील फ्रेमचा वापर केला आहे. तसेच तुमच्या आवडीप्रमाणे या घड्याळाच्या पट्ट्याची निवड तुम्ही करू शकता.  

Fossil Skagen Falster Gen 6 ची किंमत 

Fossil Skagen Falster Gen 6 ची किंमत कंपनीनं 21,995 रुपये ठेवली आहे. तुम्ही हे वॉच Skagen च्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा Fossil स्टोरवरून विकत घेऊ शकता.  

स्पेसिफिकेशन्स 

Fossil Skagen Falster Gen 6 स्मार्टवॉचमध्ये 1.28-इंचाचा वर्तुळाकार AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनं या वॉचमध्ये 42mm स्टेनलेस स्टील फ्रेम दिली आहे. विशेष म्हणजे यात Qualcomm Snapdragon Wear 4100+ चिपसेटची प्रोसेसिंग पावर मिळते. घड्याळात देखील 1GB RAM आणि 8GB स्टोरेज देण्यात आली आहे.  

यात गुगलची WearOS 2 ही खास वियरेबल्सची ऑपरेटिंग सिस्टम मिळते. जी लवकरच WearOS 3 अपडेट केली जाईल. अन्य स्मार्टवॉचप्रमाणे Skagen Falster Gen 6 मध्ये देखील हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेन्सर आणि स्टेप काउंटर हे बेसिक हेल्थ फिचर मिळतात. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.0 LE, Wi-Fi, GPS आणि NFC SE चे ऑप्शन मिळतात. Skagen Falster Gen 6 मध्ये 34 ATM वॉटर रेजिस्टन्स रेटिंग देण्यात आली आहे. सिंगल चार्जवर हे वॉच 24 तास वापरता येतं, असा दावा कंपनीनं केला आहे.  

Web Title: Fossil Skagen Falster Gen 6 Premium Smartwatch Launched In India  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.