मोबाईलचा पॅटर्न लॉक विसरलात? असा करा अनलॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 16:07 IST2018-11-18T16:05:21+5:302018-11-18T16:07:29+5:30
आजकाल मोबाईल फोनमध्ये खूप महत्वाची आणि गोपनिय माहिती असते.

मोबाईलचा पॅटर्न लॉक विसरलात? असा करा अनलॉक
आजकाल मोबाईल फोनमध्ये खूप महत्वाची आणि गोपनिय माहिती असते. यामुळे सर्वचजण निदान पॅटर्नलॉक तरी ठेवला जातो. हा पॅटर्नलॉक तसा सहजासहजी खोलता येत नाही. मात्र, हा पॅटर्नलॉक स्व:ताच विसरायला झाले तर पंचाईत होते. एका क्लृप्तीद्वारे हे लॉक खोलता येते.
अँड्रॉईड डिव्हाईस लॉक झाल्यास त्याला अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजरद्वारे खोलता येऊ शकते. हे अॅप किंवा वेबसाईट गुगलचीच आहे. यामुळे तुमचा मोबाईलवरील जीमेल आयडी आणि पासवर्ड लक्षात असल्यास त्याद्वारे अनलॉक करता येते.
यासाठी कॉम्प्युटरवर जीमेल लॉग इन करून अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजरवर जाऊन तुम्ही सध्या वापरत असलेले डिव्हाईस शोधावे. या डिव्हाईसच्या टॅबवर जाऊन अनलॉक करावे. मात्र, यासाठी फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन सुरु असणे गरजेचे असते. या मॅनेजरवर तुम्ही कोणत्यावेळी कुठे होता याबाबतचीही माहिती मिळते.
डिव्हाईसचे पॅटर्नलॉक विसरायला झाल्यास आणखी काही उपाय आहेत. तुम्हाला फरगॉट पॅटर्नवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला जीमेल खात्याची माहिती द्यावी लागेल.
वरील दोन्ही पर्यायांनी लॉक निघत नसल्यास शेवटा पर्याय हा की फॅक्टरी रिसेट. मात्र, या पर्यायामुळे फोनमधील सर्व माहिती डिलीट होईल. मेमरीकार्ड मधील माहिती तशीच राहते. फोन स्वीच ऑफ करून ऑन करताना अप व्हॉल्यूम बटन, होम बटन आणि पावर बटन एकाचवेळी काही सेकंदांसाठी दाबून ठेवावे. यानंतर काळ्या स्क्रीनवर काही पर्याय दिसतील. यामध्ये पॅक्टरी रिसेटचा पर्याय निवडावा.