flipkart mobile bonanza sale offering huge discount on smartphones | खूशखबर! धमाकेदार सेलमध्ये 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार 25 हजारांपर्यंत बंपर सूट, जाणून घ्या टॉप डील्स

खूशखबर! धमाकेदार सेलमध्ये 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार 25 हजारांपर्यंत बंपर सूट, जाणून घ्या टॉप डील्स

नवी दिल्ली - ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांची जय्यत तयारी सुरू आहे. फ्लिपकार्टवरून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर हा सेल बेस्ट आहे. यामध्ये ग्राहकांना विविध कंपनीच्या स्मार्टफोन खरेदीवर भरघोस सूट देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर (Flipkart) Mobiles Bonanza सेलची सुरुवात झाली आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुमच्या पसंतीच्या मोबाईलवर तब्बल 25 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. सेलमध्ये ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रान्झॅक्शन वर 10 टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर सोबत कम्प्लीट मोबाईल प्रोटेक्शन सुद्धा दिला जाणार आहे. टॉप डील्स संबंधी जाणून घ्या...

LG G8X वर बंपर सूट

LG G8X ड्यूअल स्क्रीनचा स्मार्टफोन 2019 मध्ये लाँच करण्यात आला होता. यावेळी या फोनची किंमत 49,999 रुपये होती. फ्लिपकार्टच्या मोबाRल बोनांजा सेलमध्ये या फोनला तुम्ही 24,009 रुपयांच्या सूट सोबत खरेदी करू शकता. जर तुम्ही ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड वरून पेमेंट केले तर हा फोन तुम्हाला 25,009 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. 6 जीबी रॅम प्लस 128 जीबी इंटरनल स्टोरेज सोबत या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर दिला आहे.

रियलमी 7 जबरदस्त एक्सचेंज ऑफर

सेलमध्ये या फोनची सुरुवातीची किंमत 17,999 रुपयांऐवजी 13,999 रुपये झाली आहे. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी ही किंमत 12,999 रुपये आहे. फोनला एक्सचेंज ऑफर घेतल्यास 16,150 रुपयांपर्यंत फायदा मिळणार आहे. 8 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत या फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे.

मोटो G 5G वर जबरदस्त डील

स्नॅपड्रॅगन 750G सोबत येणारा हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. सेलमध्ये या फोनची किंमत 19,999 रुपये झाली आहे. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास हा फोन 18,999 रुपये होईल. एक्सचेंज ऑफर मध्ये हा फोन 16,500 रुपयांपर्यंत एक्स्ट्रा सूट सोबत खरेदी करू शकता. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत या फोनमध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

सॅमसंग A21s खरेदीची जबरदस्त संधी

सॅमसंगचा हा बजेट स्मार्टफोन 28 फेब्रुवारीपर्यंत 13,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 1 हजार रुपयांची डिस्काउंट मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनला खरेदी केल्यास 13,450 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतो. 4 जीबी रॅम प्लस 64 जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये Exynos 850 प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. फोनच्या रियरमध्ये 48 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

Web Title: flipkart mobile bonanza sale offering huge discount on smartphones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.