शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
2
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
3
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
4
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
6
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
7
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
8
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
9
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
10
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
11
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
12
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
13
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
14
‘आमच्यावर बॉम्ब फेकले तर अमेरिकेचे..., तणाव वाढत असताना इराणची थेट धमकी   
15
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
16
भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
17
PM Modi: भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
18
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
19
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
20
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
Daily Top 2Weekly Top 5

Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 16:36 IST

Flipkart Pre-Reserve Pass News: फ्लिपकार्टवर त्यांच्या बहुप्रतिक्षित 'बिग बिलियन डेज' सेलमध्ये ग्राहकांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप होत आहे.

वॉलमार्टच्या मालकीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर त्यांच्या बहुप्रतिक्षित 'बिग बिलियन डेज' सेलमध्ये ग्राहकांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप होत आहे. कंपनीने सेलच्या काही दिवस आधी ५ हजार रुपयांत 'प्री-रिझर्व्ह पास' विकले होते. या पासची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 'आयफोन १६ प्रो' मोठ्या सवलतीत मिळेल, असे आश्वासन कंपनीने दिले. मात्र, अनेक ग्राहकांना आयफोन मिळाला नाही आणि त्यांचे ५ हजार रुपयेही कंपनीने परत केले नाहीत, असा दावा ग्राहक करत आहेत.

प्री-रिझर्व्ह पास खरेदी करूनही 'आयफोन १६ प्रो' (१२८ जीबी) सवलतीच्या दरात मिळाला नाही, अशी तक्रार अनेक वापरकर्ते एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करत आहेत. अभिषेक यादव नावाच्या एका एक्स वापरकर्त्याने पोस्टमध्ये लिहिले की, त्याला प्री-रिझर्व्ह पास खरेदी करूनही आयफोन मिळाला नाही आणि त्याचे ५ हजार रुपये गमावले आहेत. कंपनीने कमी किमतीत आयफोन १६ प्रो चे मर्यादित युनिट्स विकले, पण ज्यांना तो मिळाला नाही, त्यांना पैसे परत करण्यात आले नाहीत.

कंपनीचे नियम आणि अटी काय सांगतात?

फ्लिपकार्टने त्यांच्या विक्रीच्या अटी आणि शर्तींमध्ये स्पष्ट केले होते की, हा ५ हजार रुपयांचा प्री-रिझर्व्ह पास रिफंडेबल नाही. कंपनीच्या नियमांनुसार, जर ग्राहक पहिल्या ४८ तासांमध्ये 'आयफोन प्रो' (१२८ जीबी) खरेदी करू शकला नाही. तर, पास आपोआप रद्द होईल आणि पैसे परत केले जाणार नाहीत.

फ्लिपकार्टवर अन्याय्य नफा कमावल्याचा आरोप

जर ग्राहक सवलतीच्या दरात आयफोन खरेदी करू शकला नाही, तर कंपनीने ५ हजार रुपयांचा प्री-पास परत करणे किंवा ग्राहकाला दुसऱ्या उत्पादनाच्या खरेदीसाठी सवलत कायम ठेवणे अपेक्षित होते. मात्र, कंपनीने तसे केले नाही. परिणामी, ज्या ग्राहकांना 'आयफोन १६ प्रो' मिळाला नाही, त्यांचे प्रत्येकी ५ हजार रुपयांचे नुकसान झाले आणि फ्लिपकार्टने यातून मोठा 'अन्याय्य नफा' कमावल्याचा आरोप ग्राहक करत आहेत.

फ्लिपकार्टविरुद्ध ग्राहक न्यायालयात जाणार?

लाखो वापरकर्त्यांनी हा पास खरेदी केला असण्याची शक्यता आहे. परंतु, प्रत्यक्षात किती जणांना सवलतीत आयफोन १६ प्रो मिळाला. हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. एक्सवरील बहुतांश तक्रारींवरून असे दिसते की, मोठ्या संख्येने ग्राहकांना आयफोन मिळाला नाही. संतप्त झालेले अनेक वापरकर्ते आता फ्लिपकार्टविरुद्ध ग्राहक न्यायालयात खटला दाखल करण्याबद्दल चर्चा करत आहेत, कारण हजारो ग्राहकांचे ५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा त्यांचा दावा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Flipkart faces fraud allegations over iPhone 16 Pro Big Billion Days sale.

Web Summary : Flipkart is under fire for allegedly deceiving customers during its Big Billion Days sale. Despite selling pre-reserve passes promising discounted iPhone 16 Pro, many customers didn't receive the phone and weren't refunded, leading to accusations of unfair profit and potential legal action.
टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञानApple Incअॅपलfraudधोकेबाजी