flipkart big billion day sale best offers on nokia moto oppo and vivo smartphones | Flipkart Big Billion Days Sale : केवळ जुन्याच नाही तर लेटेस्ट स्मार्टफोनवरही मिळणार सूट 

Flipkart Big Billion Days Sale : केवळ जुन्याच नाही तर लेटेस्ट स्मार्टफोनवरही मिळणार सूट 

नवी दिल्ली -  सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांची जय्यत तयारी सुरू आहे. भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान ‘बिग बिलियन डेज सेल’ सुरू करणार आहे. या सेलमध्ये केवळ जुन्याच नाही तर लेटेस्ट स्मार्टफोनवर सूट मिळणार आहे. त्यामुळे या सेलचा ग्राहकांना मात्र चांगलाच फायदा होणार आहे.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये अनेक वस्तूंवर घसघशीत सूट देण्यात आली आहे. यामध्ये स्मार्टफोन, टॅब यासारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. या ऑफर्सबाबत फ्लिपकार्ट वारंवार माहिती देत आहे. या सेलमध्ये नोकिया 5.1 प्लसवर 500 रुपये तर  नोकिया 6.1 वर 1000 रुपयांची सूट मिळणार आहे. तसेच शाओमीच्या रेडमी नोट 5 प्रो या स्मार्टफोनवरही ऑफर देण्यात आली आहे. पॅनासोनिक, इंटेक्स या कंपनीच्या स्मार्टफोनवरही सूट देण्यात आली आहे. 

ओप्पोच्या एफ9 प्रो (6 जीबी) वर 2000 रुपयांची सूट मिळत आहे. जर तुम्ही हा फोन एक्सचेंज ऑफरमध्ये घेत असाल तर 3000 रुपयांची सूट मिळू शकते. अशाच प्रकारची ऑफर ही वीवो च्या वी9 यूथ (4जीबी) आणि ओप्पो एफ9 (4जीबी) वरही मिळत आहे. 34,999 किंमतीचा मोटो  झेड2 फोर्स 17,499 रुपयांना तर 18,999 रुपये किंमतीचा मोटो झेड2 प्ले 9999 रुपयांना सेलमध्ये मिळणार आहे. 

Web Title: flipkart big billion day sale best offers on nokia moto oppo and vivo smartphones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.