स्मार्टफोनच्या डिस्प्लेवरच असेल फिंगरप्रिंट स्कॅनर

By शेखर पाटील | Published: December 13, 2017 02:34 PM2017-12-13T14:34:01+5:302017-12-13T15:07:30+5:30

सध्या बहुतांश स्मार्टफोन्समध्ये होम बटन अथवा मागील बाजूस असणारे फिंगरप्रिंट स्कॅनर आता डिस्प्लेवरच वापरता येणार आहे. या संदर्भात सायनॅप्टीक्स या कंपनीची ताजी घोषणा लक्षणीय मानली जात आहे.

Fingerprint scanner will be on a smartphone display | स्मार्टफोनच्या डिस्प्लेवरच असेल फिंगरप्रिंट स्कॅनर

स्मार्टफोनच्या डिस्प्लेवरच असेल फिंगरप्रिंट स्कॅनर

googlenewsNext

फिंगरप्रिंट स्कॅनर हा स्मार्टफोनचा जवळपास अविभाज्य घटक बनला आहे. अगदी फ्लॅगशीपच नव्हे तर किफायतशीर मूल्याच्या स्मार्टफोनमध्येही हे फिचर दिलेले असते. याच्या मदतीने स्मार्टफोन लॉक/अनलॉक करता येतो. आजवर समोरच्या बाजूस असणारे होम बटन अथवा मागील बाजूस स्वतंत्र जागेत फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलेले असते. अलीकडच्या काळातील स्मार्टफोनमध्ये अ‍ॅपलने टच आयडी हे अतिशय परिणामकारक फिचर सादर केले असून यासाठीही होम बटनाचाच वापर करण्यात येतो. या पार्श्‍वभूमिवर, फिंगरप्रिंट स्कॅनरच्या क्षेत्रातील ख्यातनाम कंपनी असणार्‍या सायनॅप्टीक्सने क्लिअर आयडी एफएस९५०० या ऑप्टीकल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरची घोषणा केली आहे.

हा नवीन फिंगरप्रिंट स्कॅनर इन-डिस्प्ले या प्रकारातील असल्याने आता स्मार्टफोनच्या स्क्रीनवरच फिंगरप्रिंट स्कॅनिंगची सुविधा युजर्सला वापरण्यासाठी मिळणार आहे. ही प्रणाली सेंट्री पॉईंट तंत्रज्ञानाने युक्त असून वापरण्यासाठी अतिशय सुलभ आणि सुरक्षित असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. ही बायोमेट्रीक प्रणाली अगदी थ्री-डी फेशियल रेकग्निशनपेक्षाही सुरक्षीत असल्याचे सायनॅप्टीक्सचे म्हणणे आहे. यासाठी पाच कंपन्यांशी करार करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. या कंपन्यांची नावे सायनॅप्टीक्सने जाहीर केलेली नसली तरी सूत्रांच्या माहितीनुसार यात अ‍ॅपल, सॅमसंग, विवो, हुआवे आणि ओप्पो या कंपन्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी विवो कंपनी या प्रकारातीलच स्मार्टफोन सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात एफएस९५०० या ऑप्टीकल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असू शकते. जानेवारी महिन्यात होणार्‍या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये (सीईएस-२०१८) सायनॅप्टीक्स कंपनी आपल्या क्लिअर आयडी एफएस९५०० या प्रणालीस प्रदर्शीत करण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Fingerprint scanner will be on a smartphone display

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.