शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या व्हॉट्सअॅपने तब्बल 10 लाख लोकांना गंडवलं, तुमचं व्हॉट्सअॅप फेक नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 16:59 IST

या अॅप डेव्हलपरने गुगलच्या सुरक्षेला ठेंगा दाखवला आहे.हुबेहूब व्हॉट्सअॅपप्रमाणेच दिसत असल्यामुळे आणि नावही हुबेहूब दिल्यामुळे लाखो युझर्सची फसवणूक

मुंबई: गुगलच्या सुरक्षेला ठेंगा दाखवत WhatsApp चं बनावट अॅप प्ले स्टोअरवर आहे, हैराण करणारी गोष्ट म्हणजे तब्बल 10 लाखांहून जास्त युझर्सनी हे अॅप डाउनलोडही केलं आहे. प्ले स्टोअरवर Update WhatsApp नावाचं एक अॅप असून  हुबेहूब व्हॉट्सअॅपप्रमाणेच दिसत असल्यामुळे लाखो युझर्सने हेच अॅप डाऊनलोड केलं.

सर्वात धोकादायक म्हणजे हे बनावट अॅप देखील WhatsApp Inc डेव्हलपरच्या म्हणजे ख-या डेव्हलपरच्या नावाने आहे. बनावट अॅप ओळखण्यासाठी युझर्स डेव्हलपरचं नाव वाचतात. मात्र या डेव्हलपरने नावही हुबेहूब दिल्यामुळे लाखो युझर्सची फसवेगिरी झाली.हॅकर्सने युनिकोडचा वापर करुन हुबेहूब नावं दिलं असावं, असं बोललं जात आहे. यापूर्वीही अॅपलची वेबसाइट apple.com  युनिकोडद्वारे ओपन करून फसवणूकीचा प्रकार समोर आला होता.  

रेडिट युझरने या अॅपचा एक स्क्रीन शॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये WhatsApp+Inc%C3%A0 लिहिलं आहे. मात्र ते गुगल प्ले स्टोअरवर WhatsApp Inc डेव्हलपरच्या नावाने दिसतं आणि दुसरे कोड दिसत नाहीत. 

अगदी साध्या चॅटिंगपासून ते तातडीने महत्त्वाचा मेसेज देण्यापर्यत व्हॉट्सअॅप हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात व्हॉट्सअॅपविना मिनिटभर राहण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. जगभरात अब्जावधी लोकंव्हॉट्सअॅपचा वापर करतात, अशात  तुम्हीही तुमचं अॅप बनावट आहे, की खरं हे तातडीने तपासून पाहण्याची गरज आहे.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपSocial Mediaसोशल मीडिया