शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Facebook वर लवकरच येणार Whatsapp सारखं फीचर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 14:15 IST

फेसबुक लवकरच Facebook Messenger वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या पर्यायाचे फीचर  सुरू करणार आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सना 'डिलीट फॉर एवरीवन' हा पर्याय मिळणार आहे.

ठळक मुद्देWhatsapp वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या नव्या फीचर पर्यायाला युजर्सनी खूप पसंती दर्शवली आहे. Whatsapp सारखाच हा पर्याय लवकरच फेसबुकमध्येही दिसणार आहे.फेसबुक लवकरच Facebook Messenger वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या पर्यायाचे फीचर सुरू करणार आहे.

नवी दिल्ली - Facebook आणि Whatsapp नेहमीच युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतात. Whatsapp वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या नव्या फीचर पर्यायाला युजर्सची चांगलीच पसंती मिळाली. Whatsapp सारखाच हा पर्याय लवकरच फेसबुकमध्येही दिसणार आहे. फेसबुक लवकरच Facebook Messenger वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या पर्यायाचे फीचर सुरू करणार आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सना 'डिलीट फॉर एवरीवन' हा पर्याय मिळणार आहे. सध्या फेसबुकवर या फीचरची चाचणी करण्यात येत आहे. 

एका युजरने याचा स्क्रीनशॉट रेडिटवर शेअर केला आहे. यामध्ये मेसेज डिलीट करण्याचे दोन पर्याय दाखवण्यात आले आहेत.  मेसेज डिलीट करण्यासाठी 'Remove for everyone' आणि 'Remove for you' अशा दोन पर्यायाचा समावेश फेसबुक करणार आहे. फेसबुकच्या मेसेंजरवरून पाठवलेला मेसेज डिलीट करता येत नाही. Whatsapp वर तासाभरात मेसेज डिलिट करण्याची सुविधा युजर्संना देण्यात आली आहे. त्यामुळे अनावश्यक किंवा चुकून पाठवलेला मेसेज डिलीट करता येतो. त्यामुळेच आता फेसबुकवरील मेसेज डिलीट करता यावेत यासाठी फेसबुकने हे नवीन फीचर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

Whatsapp वर सध्या एका तासात मेसेज डिलीट करण्याची सुविधा आहे. परंतु, फेसबुकवर किती वेळ अशी सुविधा देण्यात येणार आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. फेसबुक आपल्या मेसेंजर अॅपमध्ये सातत्याने नवनवीन फीचर्स अॅड करत आहे.  अॅन्ड्रॉइड मेसेंजर अॅपमध्ये डार्क मोड फीचरची चाचणी करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :FacebookफेसबुकWhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान