शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

फेसबुक मॅसेंजर किडस् अ‍ॅप अँड्रॉइडवर दाखल

By शेखर पाटील | Updated: February 16, 2018 12:46 IST

खास बालकांसाठी विकसित करण्यात आलेले फेसबुक मॅसेंजर किडस् अ‍ॅप आता अँड्रॉइड प्रणालीसाठीदेखील सादर करण्यात आले आहे.

खास बालकांसाठी विकसित करण्यात आलेले फेसबुक मॅसेंजर किडस् अ‍ॅप आता अँड्रॉइड प्रणालीसाठीदेखील सादर करण्यात आले आहे.

फेसबुकतर्फे गत डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी मॅसेंजर किडस् अ‍ॅप सादर करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात याला प्रायोगिक अवस्थेत आयओएस प्रणालीसाठी सादर करण्यात आले होते. आता हे अ‍ॅप अँड्रॉइड प्रणालीसाठी सर्वांना सादर करण्यात आले आहे. सध्याच्या नियमानुसार १३ वर्षांच्या आतील असणारे फेसबुक आणि फेसबुक मॅसेंजरचा वापर करू शकत नाहीत. मात्र लॉगीनमधील सुलभ प्रक्रियेमुळे याचे सर्रास उल्लंघन होत असते. यातच सोशल मीडियात काय पहावे आणि काय नाही? याची समज बालकांना नसते. परिणामी, त्यांना अपरिपक्व वयातच भलतेच काही पहायला मिळते. या बाबींचा विचार करता फेसबुकने मॅसेंजर किडस् या नावाने स्वतंत्र चॅट अ‍ॅप सादर केले आहे. ही फेसबुक मॅसेंजरची खास मुलांसाठी असणारी आवृत्ती आहे. ६ ते १३ या वयोगटासाठी हे मॅसेंजर असेल. यात लॉगीन करण्यासाठी पालकाच्या अकाऊंटची आवश्यकता असेल. म्हणजेच यात मुलांचे पालक या अ‍ॅपसाठी लॉगीन करतील. यानंतर या अ‍ॅपवर पालकांचेच नियंत्रण असेल. म्हणजेच त्यांनी कुणाशी चॅटींग करावी आणि कुणाशी नाही? हे पालकच ठरवतील. तसेच हे अ‍ॅप इन्स्टॉल करण्यासाठी मुलांना स्वतंत्र अकाऊंटची आवश्यकत नाही. तर पालकांच्या अकाऊंटवरूनच याला इन्स्टॉल करता येणार आहे. एकदा का मॅसेंजर किडस् हे अ‍ॅप इन्स्टॉल केले की, पालक आपल्या मुलांनी कुणाशी संपर्क करावा याची यादी निश्‍चित करू शकतात. त्यांनी अ‍ॅप्रुव्ह केलेल्या लोकांशी या मॅसेंजरवरून चॅटींग करता येईल. यात वैयक्तीक आणि ग्रुप या दोन्ही प्रकारच्या चॅटींगची सुविधा दिलेली आहे. चॅटींगमध्ये शब्द, प्रतिमा, इमोजी, अ‍ॅनिमेशन्स, व्हिडीओ, स्टीकर्स आदींचा समावेश असेल. या सर्व बाबी खास बालकांसाठी विकसित केलेल्या आहेत. म्हणजेच यात अ‍ॅडल्ट कंटेंट नसेल. तसेच मॅसेंजर किडस् अ‍ॅपमध्ये जाहिरातीदेखील नसतील असेल फेसबुकने स्पष्ट केले आहे. या माध्यमातून होणार्‍या संवादांना संबंधीत बालक डिलीट करू शकणार नाही. ते डिलीट करण्याचे अधिकार त्याच्या पालकांना असतील. यामुळे यावर खर्‍या अर्थाने पालकांचे नियंत्रण असणार आहे. विशेष बाब म्हणजे हे स्वतंत्र अर्थात स्टँडअलोन अ‍ॅप असून यात इन-अ‍ॅप परचेसींगची सुविधा नसल्याचेही फेसबुकने स्पष्ट केले आहे. हे अ‍ॅप आता अँड्रॉइडसाठीही लाँच करण्यात आले असून कुणीही ते गुगल प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करू शकणार आहे.

टॅग्स :Facebookफेसबुक