शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

गेमिंग लव्हर्ससाठी खूशखबर, फेसबुकने लाँच केला Gaming Tab

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 13:22 IST

फेसबुकने गेमिंग लव्हर्स युजर्ससाठी एक Gaming Tab लाँच केला आहे. फेसबुकच्या मेन नेविगेशन पेजवर युजर्सना आता एक वेगळं सेक्शन दिसणार आहे.

ठळक मुद्देफेसबुकने गेमिंग लव्हर्स युजर्ससाठी एक Gaming Tab लाँच केला आहे.फेसबुकच्या मेन नेविगेशन पेजवर युजर्सना आता एक वेगळं सेक्शन दिसणार आहे. गेमिंग पेजवर युजर्सना अनेक इंटरेस्टिंग गेमचे ऑप्शन देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे गेम्स युजर्सना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळता येणार आहेत. 

नवी दिल्ली - फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुकने यावेळी गेमिंग लव्हर्स युजर्ससाठी एक Gaming Tab लाँच केला आहे. फेसबुकच्या मेन नेविगेशन पेजवर युजर्सना आता एक वेगळं सेक्शन दिसणार आहे. यामुळे युजर्स गेमिंग पेजवर थेट जाऊ शकणार आहेत. गेमिंग पेजवर युजर्सना अनेक इंटरेस्टिंग गेमचे ऑप्शन देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे गेम्स युजर्सना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळता येणार आहेत. 

Gaming Tab वर युजर्सना गेम्सचे लोकप्रिय ग्रुप्स फॉलो करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच या नव्या टॅबमध्ये युजर्स आपल्या आवडीने गेम्स निवडून अनेक नवीन कॉन्टॅक्ट शोधू शकतात. रिपोर्टनुसार, युजर्सना या टॅबमध्ये टॉप स्टीमर्स आणि गेम पब्लिशर्सचे व्हिडीओ तसेच इतर गेमिंग गुप्सबाबत अपडेट दिसणार आहेत. सर्व लोकांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी एक वेगळा गेमिंग टॅब लाँच केलं आहे. जगभरात जवळरपास 700 मिलियन म्हणजेच 70 कोटी युजर्स रोज व्हिडीओ गेम खेळतात असा दावा कंपनीने केला आहे. 

फेसबुकने हे फीचर रोलआऊट करण्यास सुरुवात केली असून लवकरच हे सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. तसेच गेल्या वर्षीपासून या फीचरवर काम सुरू असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. फेसबुक लवकरच आपल्या अ‍ॅन्ड्रॉईड युजर्ससाठी एक नवीन वेगळं गेमिंग अ‍ॅप देखील आणणार आहे. सध्या कंपनी या नव्या गेमिंग अ‍ॅपवर काम करत आहे. तसेच या नवीन अ‍ॅपमध्ये अनेक दमदार फीचर्स असणार आहेत. या नव्या अ‍ॅपसाठी फिडबॅकही घेण्यात येत असल्याची माहिती फेसबुकनेच आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे. 

फेसबुकवरून व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टालाही मॅसेज पाठविता येणार...गुगलच्या ऑर्कुटसारखी फेसबुकची स्थिती होऊ नये म्हणून फेसबुक कंपनी नवनवीन फीचर आणत असतं. आता फेसबुकवरून इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही मॅसेज पाठविता येणार आहेत. ही सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवरूनही फेसबुकला मॅसेज पाठविण्यासाठी मिळणार आहे. खरंतर फेसबुक त्याच्या मालकीच्या या तिन्ही प्लॅटफॉर्मला एकमेकांना जोडण्याची तयारी करत आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार ही कल्पना मार्क झुकरबर्ग यांना सुचली आहे. या तिन्ही प्लॅटफॉर्मच्या अ‍ॅपचा वापर बदलणार नसून केवळ एकमेकांना क्रॉस प्लॅटफॉर्मवर मॅसेज पाठविता येणार आहेत. 

Facebook वर लवकरच येणार Whatsapp सारखं फीचरFacebook आणि Whatsapp नेहमीच युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतात. Whatsapp वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या नव्या फीचर पर्यायाला युजर्सची चांगलीच पसंती मिळाली. Whatsapp सारखाच हा पर्याय लवकरच फेसबुकमध्येही दिसणार आहे. फेसबुक लवकरच Facebook Messenger वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या पर्यायाचे फीचर सुरू करणार आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सना 'डिलीट फॉर एवरीवन' हा पर्याय मिळणार आहे. सध्या फेसबुकवर या फीचरची चाचणी करण्यात येत आहे. 

टॅग्स :Facebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञान