शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

युजर्सच्या मृत्यूनंतर Facebook-Instagram अकाऊंटचं नेमकं काय होतं, तुम्हाला माहितीय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 18:19 IST

Facebook , Instagram किंवा WhatsApp प्रत्येकजण वेगवेगळे इन्स्टंट मेसेजिंग App वापरतं. यामुळे लोक एकमेकांशी नेहमी जोडलेले राहतात.

इंटरनेट आता जगण्याचा एक अविभाज्य भाग झालं आहे. तुम्ही इंटरनेट वापरत नसाल तर, जगापासून दूर आहात असेच मानले जाते. इंटरनेट आज सर्वांची गरज बनली असून इंटरनेटद्वारे जगभरात काय घडत आहे याची माहिती मिळत असते. अभ्यासापासून मनोरंजन आणि व्यवसायापर्यंत सर्वच इंटरनेमुळे सोपे झाले आहे. आज जवळ-जवळ प्रत्येक व्यक्तीच्या फोनमध्ये इंटरनेट आहे आणि अनेक Social Media हँडल आहेत. Facebook , Instagram किंवा WhatsApp प्रत्येकजण वेगवेगळे इन्स्टंट मेसेजिंग App वापरतं. यामुळे लोक एकमेकांशी नेहमी जोडलेले राहतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटचे काय होते? किंवा अचानक एखाद्याचा कार अपघातात किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याचे फेसबुक-इन्स्टाग्राम वगैरे अकाऊंट कोण चालवणार?  याबाबत जाणून घेऊया...

सर्च इंजिन Google प्रमाणेच फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही मृत्यूनंतर अकाऊंट हटविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मृत्यूनंतर, व्यक्तीचे अकाऊंट, प्रोफाइल, पोस्ट इत्यादी सर्व माहिती सर्व्हरवरून हटविली जाते. दुसरीकडे, जर युजरला हे नको असेल तर तो मेमोरियल म्हणून अकाऊंट देखील हटवू शकतो आणि दुसरे कोणीतरी ते मॅनेज करू शकते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे खाते कोणी चालवू नये असे वाटत असेल, तर फेसबुक-इन्स्टाग्रामच ते अकाऊंट हटवते. मात्र यासाठी युजरला आधी काही सेटिंग्ज कराव्या लागतात. 

असं डिलीट होईल अकाऊंट

जर तुम्हाला तुमचे खाते मेमोरियल म्हणून ठेवायचे नसेल आणि ते कायमचे हटवायचे असेल तर, तुम्हाला एक सेटिंग करावी लागेल. मृत्यूनंतर दुसऱ्या व्यक्तीला फेसबुकला सांगावे लागेल की, युजरचा मृत्यू झाला आहे. यानंतर कंपनी त्याचे खाते सर्व्हरवरून कन्फर्म करून डिलीट करते . मात्र, यासाठी खाते मालकाला एक सेटिंग करावी लागेल. युजरला आधी सेटिंगमध्ये जाऊन 'डिलीट आफ्टर डेथ' हा पर्याय निवडावा लागेल

यासाठी तुम्हाला Settings and Privacy सिलेक्ट करावे लागेल आणि नंतर Access and Control मधून Memorialisation Settings वर जावे लागेल. येथे तुम्हाला डिलीट आफ्टर डेथचा पर्याय मिळेल, जो तुम्हाला निवडून ठेवावा लागेल. युजरला त्याचे अकाऊंट हटवायचे नसेल तर ते मेमोरियल म्हणून देखील ठेवू शकता. यासाठी तुम्हाला फेसबुक App मधील सेटिंग्ज आणि प्रायव्हसीमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला मेमोरिअलायझेशन सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि निवडा लेगसी कॉन्टॅक्ट निवडा, येथे तुम्ही अशी व्यक्ती निवडा, जी तुमच्यानंतर तुमच्या अकाऊंटची काळजी घेईल. तुम्ही तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेली व्यक्तीच निवडू शकता. फेसबुकप्रमाणेच इन्स्टाग्रामची प्रोसेस आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :FacebookफेसबुकInstagramइन्स्टाग्राम