#FaceAppChallenge : म्हातारं करणारं हे FaceApp नक्की आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 11:07 AM2019-07-18T11:07:40+5:302019-07-18T12:03:11+5:30

आपण म्हातारपणी कसे दिसू याचाच ट्रेंड सध्या जोरदार व्हायरल होत आहे. फेसअ‍ॅप या अ‍ॅपच्या मदतीने सर्वच जण FaceAppChallenge स्वीकारत आहेत.

faceapp ai face editor app goes viral on social media faceapp download how to use faceapp | #FaceAppChallenge : म्हातारं करणारं हे FaceApp नक्की आहे तरी काय?

#FaceAppChallenge : म्हातारं करणारं हे FaceApp नक्की आहे तरी काय?

Next
ठळक मुद्देफेसअ‍ॅप हे 2017 साली लाँच करण्यात आले होते.फेसअ‍ॅप या अ‍ॅपच्या मदतीने सर्वच जण FaceAppChallenge स्वीकारत आहेत. कलाकार आणि क्रिकेटपटूंनी देखील ओल्ड एज हा फिल्टर वापरून फोटो शेअर केले आहेत.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर दिवसभरात असंख्य गोष्टी या व्हायरल होत असतात. हल्ली व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, फेसबूक, इन्स्टाग्राम आणि ट्वीटर ओपन केल्यावर म्हातारपणाचाच विषय रंगलेला दिसत आहे. आपण म्हातारपणी कसे दिसू याचाच ट्रेंड सध्या जोरदार व्हायरल होत आहे. फेसअ‍ॅप या अ‍ॅपच्या मदतीने सर्वच जण FaceAppChallenge स्वीकारत आहेत. सामान्यापासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच जण हे फेसअ‍ॅप वापरून आपले फोटो शेअर करत आहेत. कलाकार आणि क्रिकेटपटूंनी देखील ओल्ड एज हा फिल्टर वापरून फोटो शेअर केले आहेत.

फेसअ‍ॅप हे 2017 साली लाँच करण्यात आले होते. त्यावेळी त्याची खूप चर्चा झाली. मात्र आता अचानक हे अ‍ॅप पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नेटकरी हे अ‍ॅप वापरुन त्यांच्या म्हातारपणीचे फोटो शेअर करत आहेत. फेसअ‍ॅपमध्ये इन्स्टाग्रामप्रमाणे अनेक फिल्टर्स आहेत मात्र त्यातील ओल्ड फेस फिल्टर खूपच लोकप्रिय झाले असून या फिल्टरचा वापर करुनच अनेकजण म्हातारपणी आपण कसे दिसू ते पाहत आहेत. तसेच या अ‍ॅपमध्ये अनेक फिल्टर आहेत. तरुणपण पाहण्यासाठी फिल्टर, केसांचा रंग बदलण्याचे, चेहऱ्यावर मेकअप करणारे देखील काही फिल्टर आहेत. 

फेसअ‍ॅप हे आयओएस आणि अ‍ॅन्ड्रॉईड अशा दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. iOS वर या अ‍ॅपचं तीन दिवसांचं ट्रायल मिळतं. त्यानंतर हे अ‍ॅप वापरायचं असल्यास त्यासाठी पैसे द्यावे लागतात. या अ‍ॅपमध्ये अनेक फिल्टर आणि फीचर्स आहेत. फेसअ‍ॅप हे आर्टिफिशियल (AI) इंटेलिजन्स अल्गोरिदमवर काम करतं. एआयच्या मदतीने युजर्सचा चेहरा कसा दिसेल हे सांगितलं जातं. ओल्ड फेस फिल्टर वापरल्यावर चेहऱ्यावर सुरकुत्या दाखवल्या जातात. एकंदरीत म्हातारपणी आपण कसे दिसू हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात या अ‍ॅपचा वापर केला जात आहे.

सावधान! FaceApp वापरणाऱ्यांची प्रायव्हसी धोक्यात

फेसअ‍ॅप लोकप्रिय झाले असले तरी याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. . म्हातारपणी लोक कसे दिसतील हे दाखवण्यासाठी न्यूरल नेटवर्कचा वापर केला जातो. ज्यामुळे युजर्सची प्रायव्हसी ही धोक्यात येऊ शकते. ट्विटरवर Elizabeth Potts Weinstein नावाच्या महिलेने एक ट्वीट केलं आहे. यामध्ये जर तुम्ही फेसअ‍ॅपचा वापर करत असाल तर तुम्ही अ‍ॅपला तुमचे फोटो, नाव, युजरनेम यासह तुम्हाला काय आवडतं या गोष्टींची माहिती वापरण्याची परवानगी देत आहात. तसेच महिलेने याचा पुरावा देत अ‍ॅपचं पॉलिसी पेज देखील शेअर केलं आहे. ही पोस्ट रीट्वीट करून अनेक लोकांनी प्रायव्हसीबाबत प्रश्न निर्माण केले आहेत. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 



सोशल मीडियाचा काही नेम नाही. कधी कोणतं चॅलेंज सुरू करतील, याचा अंदाज बांधणे अशक्य आहे. टिक टॉक चॅलेंज, बॉटलकॅप चॅलेंजनंतर आता फेसअ‍ॅप चॅलेंज सुरू झाले आहे. त्यात आपण आता जसे आहोत आणि म्हातारणात कसे दिसू, असे फोटो व्हायरल होत आहेत. यात क्रिकेटपटूंचेही फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी फेसअ‍ॅप डाऊनलोड केले आहे. 


सोशल मीडियावर सेलिब्रिटींपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनाच #SareeTwitter या ट्रेंडने देखील भुरळ घातली आहे. SareeTwitter हा हॅशटॅग वापरून महिला त्यांचे साडीतले सुंदर फोटो ट्वीट करत आहेत. सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन गोष्टी अपडेट होत असतात. एखादी गोष्ट झटपट व्हायरल होते. नवनवीन ट्रेंड हे सातत्याने येत असतात. गेल्या दोन दिवसांपासून #SareeTwitter  ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटी आणि नेते मंडळीपर्यंत सर्वच हा ट्रेंड फॉलो करत आहेत. 



न्यूयॉर्क टाइम्समध्ये साडीविषयक एक आर्टिकल छापण्यात आले होते. या आर्टिकलमध्ये साडीची प्रतिष्ठा आणि इतिहास याबाबत माहिती देण्यात आली होती. 2014 मध्ये भाजपा सरकार सत्तेत आल्यावर साडीला प्रसिद्धी देण्यात आली. प्रमोट केलं गेलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीतील विजयानंतर बनारसी साडी विणकरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत अशा आशयाचा मजकूर आर्टिकलमध्ये छापण्यात आला आहे. या आर्टिकलमधील काही गोष्टींमुळे अनेकजण नाराज झाले. त्यानंतर काही महिलांनी आपले साडीतील फोटो ट्विटरवर पोस्ट करायला सुरुवात केली. त्यामुळे सध्या #SareeTwitter हा ट्रेंड सुरू झाला आहे.

 

Web Title: faceapp ai face editor app goes viral on social media faceapp download how to use faceapp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.