इलॉन मस्क यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर नवीन मेसेजिंग सर्व्हिस "X Chat" सुरू केले आहे. ही सेवा थेट X च्या DM सेक्शनमध्ये उपलब्ध होणार असून, युजर्सना अधिक सुरक्षित आणि प्रायव्हसी-फोकस्ड चॅटिंगचा अनुभव देणार आहे.
काय आहे X Chat ?
X Chat ही X प्लॅटफॉर्मवरील नवी आणि स्वतंत्र मेसेजिंग सेवा आहे. याचा उद्देश WhatsApp आणि भारतीय Arattai सारख्या अॅप्सना टक्कर देणे हा आहे.
यामध्ये खालील महत्त्वाचे फीचर्स दिले आहेत:
एंड-टू-एंड एनक्रिप्शन
ॲडव्हान्स्ड मेसेजिंग कंट्रोल
वेगळी मेसेजिंग इनबॉक्स प्रणाली
ऑडिओ, व्हिडिओ आणि फाइल शेअरिंगसाठी एनक्रिप्टेड सपोर्ट
काय म्हणाले इलॉन मस्क?
इलॉन मस्क यांनी सांगितले की, X वर एक नवीन कम्युनिकेशन सिस्टम सुरू झाली आहे. यात एनक्रिप्शनसह चॅटिंग, ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग आणि फाइल ट्रान्सफरची सुविधा मिळेल. तसेच, लवकरच X Money लॉन्च केली जाईल.
X Chat मध्ये खास काय?
1. मेसेज एडिट/डिलीट/डिसअपिअर फीचर्स
युजर्स पाठवलेले मेसेज एडिट, डिलीट आणि पूर्णपणे गायब करू शकतात. WhatsApp वर ‘This message was deleted’ दिसते, पण X Chat वर असा कोणताही मेसेज दिसणार नाही.
2. स्क्रीनशॉट ब्लॉकिंग फीचर
प्रायव्हसी वाढवण्यासाठी X Chat मध्ये सीक्रेट मेसेजेसचे स्क्रीनशॉट घेणे शक्य होणार नाही.
3. ग्रुप चॅट + मीडिया एनक्रिप्शन
ग्रुप मेसेजेस, फोटो-व्हिडिओसुद्धा एनक्रिप्टेड असतील.
X Chat कसे वापरायचे?
सध्या X Chat हे iOS आणि वेब व्हर्जन वर उपलब्ध आहे. ते वापरण्यासाठी X च्या DM सेक्शनमध्ये जावे लागेल. अँड्रॉइड व्हर्जन लवकरच येणार आहे.
Web Summary : Elon Musk launched "X Chat" on X, aiming to rival WhatsApp. Features include end-to-end encryption, advanced message control, separate inbox, and encrypted media sharing. Users can edit/delete messages, block screenshots, and enjoy encrypted group chats. Available on iOS and web.
Web Summary : एलन मस्क ने एक्स पर "एक्स चैट" लॉन्च किया, जिसका उद्देश्य व्हाट्सएप को टक्कर देना है। फीचर्स में एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, एडवांस्ड मैसेज कंट्रोल, अलग इनबॉक्स और एन्क्रिप्टेड मीडिया शेयरिंग शामिल हैं। उपयोगकर्ता संदेशों को संपादित/हटा सकते हैं, स्क्रीनशॉट ब्लॉक कर सकते हैं और एन्क्रिप्टेड ग्रुप चैट का आनंद ले सकते हैं। आईओएस और वेब पर उपलब्ध।