इलॉन मस्क यांनी आता पैसे कमविण्यासाठी अश्लिल ट्रिक वापरण्यास सुरुवात केली आहे. ग्रोक एआयद्वारे ते आता लोकांना सशुल्क नग्न फोटो, व्हिडीओ तयार करून देणार आहेत. यासाठी नवीन Spicy Mode नावाचे फिचर आणले असून यामुळे गुन्हेगारीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीचे नग्न फोटो, व्हिडीओ बनविले जाऊ शकतात आणि ब्लॅकमेलिंग तसेच त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याचा धोका तज्ञांनी व्यक्त केला आहे.
आधीच मॉर्फ फोटोंनी लोकांच्या आयुष्यात धुमाकुळ घातला आहे. यात आता मस्क यांच्या ग्रोक एआयचे स्पायसी फिचर चिंता वाढविणार आहे. सर्वाधिक महिलांचे यात मरण असल्याचे मत व्यक्त होत आहे. xAI च्या या फीचरमुळे फक्त एका फोटोसह कोणाचेही अश्लील फोटो तयार होणार आहेत. यासाठी केवळ महिन्याला ७०० रुपयांचे मासिक सबस्क्रिप्शन ठेवण्यात आले आहे.
मस्क या ७०० रुपयांसाठी अनेकांच्या आयुष्याशी खेळ करणार आहेत. स्पायसी मोड हा प्रत्यक्षात ग्रोक इमॅजिन फीचरचा एक भाग आहे आणि तो एआय-संचालित इमेज आणि व्हिडिओ जनरेशन टूल आहे. हे फीचर iOS अॅपवर सुपरग्रोक किंवा एक्स प्रीमियम+ सबस्क्रिप्शनसह उपलब्ध आहे.
जुन्या फोटोचा किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या फोटोचा वापर करून त्याचे हुबेहुब नग्न, अॅडल्ट कंटेंट तयार करता येणार आहे. गेल्याचवर्षी डीपफेक फोटो आणि व्हिडिओंमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला होता. सेलिब्रिटी देखील यातून सुटले नव्हते. एखाद्याच्या आयुष्याच असे काही घडले आणि त्याची तक्रार झाली तरच ते फोटो मागे घेता येणार आहेत. परंतू, तोवर त्या व्यक्तीच्या आयुष्याचे पार बारा वाजणार आहेत. अनेकांना अशी बदनामी सहन होत नाही, यातून अनेकांनी आपले आयुष्य संपविलेले आहे. यामुळे याचा वापर विनाशकारी ठरणार आहे.