Electricity Bill Saving Tips: पंखा १ वर ठेवला म्हणून वीज वाचते का? 5 वर ठेवला तर...; बिल कमी करण्याची गोष्ट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 17:05 IST2023-02-20T17:02:18+5:302023-02-20T17:05:29+5:30
अनेकांचा पुर्वांपार समज आहे की फॅनचा रेग्युलेटर एकवर ठेवला की कमी वीज लागते, तर चार-पाचवर ठेवला तर जास्त.

Electricity Bill Saving Tips: पंखा १ वर ठेवला म्हणून वीज वाचते का? 5 वर ठेवला तर...; बिल कमी करण्याची गोष्ट...
आज प्रत्येकजण विजेचे बिल जादा येतेय म्हणून सांगत असतो. आता घरातील उपकरणेही वाढली आहेत. घरात आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. लाईट चालू असतात, टीव्ही देखील एकापेक्षा अधिक असतात. लॅपटॉप, कॉम्प्युटर, वॉशिंग मशीन, फ्रीज, ओव्हन, मिक्सर अशी अनेक उपकरणे आली आहेत. असे असताना कोणत्या गोष्टी वीज वाचवतील आणि कोणत्या नाही हे कळणे कठीण झाले आहे.
गिझर, एसी हे तर वीज नुसती खात असतात. अशावेळी तुमच्या घरातील फॅन पण वीज खात असेल तर. कधी विचार केलाय का १ वर फॅन ठेवला की कमी वीज लागते, आणि पाचवर ठेवला की जास्त... सहाजिक आहे ना एसी कमी टेम्परेचरवर ठेवला की जास्त वीज लागते, जास्त टेम्परेचरवर ठेवला तर कमी. पण फॅनचे तसे नसते बरं का...
अनेकांचा पुर्वांपार समज आहे की फॅनचा रेग्युलेटर एकवर ठेवला की कमी वीज लागते, तर चार-पाचवर ठेवला तर जास्त. पण तसे नाहीय. दोन्ही नंबरवर सारखीच वीज लागते. परंतू, फक्त वेग कमी होतो. आजकाल अनेकांच्या घरात जुनेच मोठ रेग्युलेटर आहेत, किंवा त्यानंतर आलेले किंवा आताचे लेटेस्ट... या रेग्युलेटरवर खरेतर वीज वाचते की तेवढीच लागले हे अवलंबून आहे.
जुने मोठे रेग्युलेटर काय करायचे? तर ते वीजेच्या प्रवाहासाठी रेझिस्टंटचे काम करायचे. यामुळे केवळ फॅनचा वेग कमी व्हायचा, पण वीज तेवढीच लागायची. आताचे लेटेस्ट रेग्युलेटर हे वीज वापर कमी करतात, कमी केल्यास वीज कमी लागते, पाच नंबरवर ठेवल्यास वीज जास्त लागते. यामुळे जर तुमच्या घरात जुने किंवा त्यानंतर आलेले रेग्युलेटर असतील तर ते लगेचच बदला. कारण त्या वीज खपाच्या खर्चात तुम्हाला अनेक नवे रेग्युलेटर खरेदी करता येतील.
हे देखील वाचा...