फेसबुकच्या डोक्याला झाला 'बंद'चा ताप; सहा तासांच्या ब्लॉकमुळे टेलिग्रामला प्रॉफिट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 08:36 AM2021-10-08T08:36:48+5:302021-10-08T08:37:19+5:30

व्हॉट्सॲपने यूझर्सच्या माहितीबद्दल नवे धोरण जाहीर केल्यानंतर चर्चेत आलेले सिग्नल ॲपही व्हॉट्सॲपच्या ६ तासांच्या बंदमुळे फायद्यात आले.

Due to Facebook server down, Telegram profits from a six-hour block | फेसबुकच्या डोक्याला झाला 'बंद'चा ताप; सहा तासांच्या ब्लॉकमुळे टेलिग्रामला प्रॉफिट

फेसबुकच्या डोक्याला झाला 'बंद'चा ताप; सहा तासांच्या ब्लॉकमुळे टेलिग्रामला प्रॉफिट

googlenewsNext

फेसबुकच्या सर्व्हर एररमुळे अलीकडेच व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम तब्बल सहा तास बंद पडले होते. जगभरातील अब्जावधी व्हॉट्सॲपप्रेमी त्यामुळे अस्वस्थ झाले. सहा तास व्हॉट्सॲपचा विरह सहन न झाल्याने अनेकांनी टेलिग्राम या अन्य सोशल मीडिया ॲपकडे स्विच ओव्हर केले. एकूणच फेसबुकच्या नुकसानामुळे टेलिग्रामचा फायदा झाला.

लोकांना आवडणारे टेलिग्रामचे फिचर्स
टेलिग्रामवर प्रोफाईल फोटो आणखी चांगला करण्याच्या कल्पना युझर्सना सुचविल्या जातात. त्यासाठी व्हॉइस चॅट विंडोतून बाहेर पडण्याची गरज भासत नाही. या फिचरला व्हॉइस चॅटसाठी मिनी प्रोफाईल असे संबोधले जाते. टेलिग्रामवर दोन नवीन फिचर वेब ॲपला जोडण्यात आली आहेत.  दोन्ही ॲप ॲनिमेटेड स्टिकर्स, डार्क मोड, चॅट फोल्डर्स यासारख्या नव्या फिचर्सना सपोर्ट करणारे आहे.

सिग्नललाही झाला फायदा
व्हॉट्सॲपने यूझर्सच्या माहितीबद्दल नवे धोरण जाहीर केल्यानंतर चर्चेत आलेले सिग्नल ॲपही व्हॉट्सॲपच्या ६ तासांच्या बंदमुळे फायद्यात आले. सिग्नलचेही यूजर्स वाढले आहेत.

Web Title: Due to Facebook server down, Telegram profits from a six-hour block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.