जर आपणही इन्स्टाग्रामवर चॅटिंग करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. यावर्षी मे महिन्यानंतर इन्स्टाग्रामवर चॅटिंग करणे पूर्वीसारखे सुरक्षित राहणार नाही. मेटा कंपनीने या प्लॅटफॉर्मवरून 'एंड-टू-एंड एन्क्रिप्शन' (End-to-end encryption) हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ८ मे २०२६ पासून ही सुरक्षा सुविधा बंद केली जाणार आहे. यासंदर्भात कंपनीने युजर्सना ॲपमध्ये नोटीस पाठवून माहितीही देण्यास सुरुवात केली आहे.काय होईल परिणाम? -एंड-टू-एंड एन्क्रिप्शन संपल्यामुळे इन्स्टाग्रामवरील तुमचे मेसेजेस आता पूर्णपणे खाजगी राहणार नाहीत. याचा अर्थ असा की, तुमच्यातील संवाद आता मेटा कंपनी एक्सेस करू शकेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही कुणाशी काय बोलता, हे तुमच्या दोघांशिवाय मेटा देखील पाहू किंवा वाचू शकणार आहे. महत्वाचे म्हणजे, डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झालेली ही सुरक्षा सेवा तीन वर्षांच्या आतच बंद केली जात आहे.
आता युजर्सकडे काय पर्याय? -ज्या वापरकर्त्यांना या बदलामुळे आपल्या गोपनीयतेची काळजी वाटते, त्यांच्यासाठी कंपनी लवकरच नवीन निर्देश जारी करणार आहे. यामध्ये युजर्सना आपला जुना चॅटिंग डेटा आणि मीडिया फाईल्स डाउनलोड करण्याची सुविधा दिली जाईल.
का घेण्यात आला असा निर्णय - मेटाने अधिकृतपणे कोणतेही कारण स्पष्ट केले नसले तरी, इंटरनेटवरील बाल लैंगिक शोषण सामग्री (CSAM) रोखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन नसल्यामुळे कंपनी मेसेजेस आणि कॉल्स स्कॅन करून आक्षेपार्ह मजकूर शोधू शकणार आहे. युरोपियन युनियनसह अनेक देशांतील सरकारे अशा आक्षेपार्ह आशयावर नियंत्रण मिळवण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांवर दबाव टाकत आहेत.
Web Summary : Instagram's end-to-end encryption ends May 8, 2026, allowing Meta to access chats. Users can download data. Move aims to combat child exploitation, pressured by governments.
Web Summary : इंस्टाग्राम का एंड-टू-एंड एन्क्रिप्शन 8 मई, 2026 को समाप्त हो रहा है, जिससे मेटा चैट एक्सेस कर सकेगा। उपयोगकर्ता डेटा डाउनलोड कर सकते हैं। यह कदम सरकारों के दबाव में बाल शोषण से निपटने के उद्देश्य से उठाया गया है।