शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

इलॉन मस्कसाठी भारताचे दरवाजे उघडले? सॅटेलाईट स्पेक्ट्रम लिलावाबाबत मोठी माहिती आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 19:09 IST

केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सॅटेलाइट ब्रॉडबँडच्या स्पेक्ट्रम वाटपावर मोठी माहिती दिली आहे.

Donald Trump-Elon Musk : दिग्गज उद्योगपती इलॉन मस्क यांच्यासाठी भारतातून एक आनंदाची बातमी आली आहे. स्टारलिंक कंपनीद्वारे सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या इलॉन मस्क यांच्यासाठी भारताचे दरवाजे लवकरच खुले होणार आहेत. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सॅटेलाइट ब्रॉडबँडच्या स्पेक्ट्रम वाटपावर मोठी घोषणा केली आहे.

स्पेक्ट्रमचा लिलाव नाही, तर वाटप होणार...ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, सॅटेलाईट ब्रॉडबँडसाठी स्पेक्ट्रमचे वाटप केले जाईल, लिलाव होणार नाही. भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे प्रमुख मुकेश अंबानी आणि एअरटेलचे प्रमुख सुनील मित्तल यांनीदेखील ही मागणी केली होती. दोन्ही भारतीय अब्जाधीश उद्योगपतींच्या मागणीनुसार स्पेक्ट्रमचे वाटप केले जाऊ शकते. पण, सॅटेलाइट ब्रॉडबँड स्पेक्ट्रम मोफत देणार नसल्याचेही सिंधियांनी स्पष्ट केले आहे. याची किंमत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ठरवणार आहे.

ITU तत्त्वांचे पालनसिंधिया पुढे म्हणाले की, प्रत्येक देशाला इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) चे अनुसरण करावे लागेल. ही अंतराळ किंवा उपग्रह स्पेक्ट्रमसाठी धोरण तयार करणारी संस्था आहे आणि ITU ने असाइनमेंटच्या आधारावर स्पेक्ट्रम देण्याच्या मुद्द्यावर स्पष्ट भाष्य केले आहे. आज जगभर पाहिले, तर सॅटेलाईटसाठी स्पेक्ट्रमचा लिलाव करणारा कोणताही देश नाही. दरम्यान, मस्क यांच्या स्टारलिंक आणि ॲमेझॉनच्या प्रोजेक्ट कुपर सारख्या जागतिक कंपन्यांनी स्पेक्ट्रम वाटपाचे समर्थन केले आहे.

स्टारलिंक भारतात येण्यास उत्सुक Jio आणि Airtel दोघेही सॅटेलाइट ब्रॉडबँड क्षेत्रात पुढे जाण्यासाठी स्पर्धा करत आहेत. तर, इलॉन मस्कदेखील जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या भारताच्या मोबाइल आणि इंटरनेट मार्केटमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत.

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्कIndiaभारतtechnologyतंत्रज्ञानJioजिओAirtelएअरटेल