शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

डॉमिनोज इंडिया सायबर हल्ला, 10 लाख क्रेडिट कार्ड डिटेल्ससह ग्राहकांची 'ही' माहिती डार्क वेबवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 10:27 AM

dominos india hack : डॉमिनोज इंडियाच्या या यादीमध्ये अशा ग्राहकांचे नाव आहे, ज्यांनी App वरून ऑर्डर केली आहे. इस्रायली सायबरक्राइम इंटेलिजन्सचे सहसंस्थापक एलन गल  (Alon Gal) यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.

नवी दिल्ली : डॉमिनोज इंडिया (Domino's India) वर मोठा सायबर हल्ला (Cyber Attack) झाला आहे. प्रसिद्ध असलेल्या पिझ्झा आउटलेटवर सायबर हल्ला करून 13 जीबीचा अंतर्गत डेटा (Internal Data) चोरल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये आयटी, लीगल, फायनान्स, मार्केटिंग, कर्मचाऱ्यांच्या माहितीसह ऑपरेशन्सच्या माहितीचा सुद्धा समावेश आहे. 

हॅकर्सचा दावा आहे की, ही माहिती त्यांना18 कोटी ऑर्डर डिटेल्सच्या मदतीने मिळाली आहे. ज्यामध्ये ग्राहकांचे (Customers) फोन क्रमांकं (Phone numbers), ई-मेल आईडी (Email id), पेमेंट डिटेल्स (Payments details), डेबिड (Debit) आणि क्रेडिट (Credit) कार्डच्या माहितीचा समावेश आहे. यामध्ये साधारण 10 लाख क्रेडिट कार्ड डिटेल्स डार्क वेबवर गेल्याची माहिती समोर आली आहे.

डॉमिनोज इंडियाच्या या यादीमध्ये अशा ग्राहकांचे नाव आहे, ज्यांनी App वरून ऑर्डर केली आहे. इस्रायली सायबरक्राइम इंटेलिजन्सचे सहसंस्थापक एलन गल  (Alon Gal) यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. दरम्यान, डॉमिनोज इंडियाकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

एलन गल यांचा दावा आहे की, डॉमिनोज इंडियाचा हॅक झालेला डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी आहे आणि हॅकर्स यासाठी चार कोटी रुपयांची मागणी करत आहेत. तसेच, हॅकर्स हा डेटा फक्त अशा विक्रेत्याला विकणार आहेत की, ज्यासाठी एक सर्च पोर्टल देखील तयार केले जात आहे, ज्याद्वारे डेटाबद्दल माहिती मिळू शकते.

(आता Facebook Messenger द्वारे WhatsApp वर पाठवू शकणार मेसेज?)

बिटकॉइनच्या माध्यमातून अघोषित किंमतीवर विकली जाते माहितीअशा प्रकारचा डेटा डार्क वेबवर बिटकॉइन (Bitcoin)या क्रिप्टोकरन्सीद्वारे अघोषित किमतीला विकला जात आहे. या डेटासाठी हॅकर्स टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधत आहेत. युझर्सचा डेटा स्टोअर करण्यासाठी पेमेंट कार्ड इंडस्ट्री डाटा सिक्युरिटी स्टँडर्डचा (PCIDSS) वापर करते. हॅकर कार्ड फिंगरप्रिंट बनवण्यासाठी हॅश अल्गोरिदमचा (Hash Algorithm) वापर करू शकतात,तर ते मास्क्ड कार्डनंबरही डिक्रिप्ट (Decrypt) करू शकतात. अशा परिस्थितीत सगळ्याच कार्डधारकांची खाती धोक्यात येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सायबर हल्ले चार वर्षात दहापटींनी वाढलेस्टॅटिस्टावर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2020 पर्यंत भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या सुमारे 70 कोटी होती. येणाऱ्या पाच वर्षांच्या काळात ही संख्या 97.4  कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. भारत जगातील सर्वात मोठी ऑनलाइन बाजारपेठ आहे, विशेष म्हणजे भारतातील इंटरनेट युजर्सची संख्या इतकी आहे की जगातील बर्‍याच विकसित देशांची लोकसंख्याही एवढी नाही. या अहवालानुसार, 2017 मध्ये भारतात 53,117 सायबर हल्ले झाले होते. 2018 मध्ये त्यात वाढ होऊन एकूण 2,08,456 सायबर हल्ले झाले. 2019 मध्ये या हल्ल्यांची संख्या 3,94,499 एवढी होती. ऑगस्ट 2020 पर्यंत सायबर हल्ल्यांची संख्या 6,96,938 इतकी होती. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमtechnologyतंत्रज्ञानonlineऑनलाइन