स्मार्ट वॉच आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी वापरता? ते कॅन्सरला निमंत्रण देऊ शकते, नवा रिसर्च डोळे उघडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 20:33 IST2025-01-28T20:33:39+5:302025-01-28T20:33:54+5:30
स्मार्टवॉचमुळे तुमचे आरोग्य सुधारेल यापेक्षा बिघडेल असा हा रिसर्च आहे. अमेरिकेच्या नॉर्ट्रे डॅम विद्यापीठाने बाजारात विकल्या जाणाऱ्या २२ स्मार्टवॉच ब्रँडच्या स्मार्टवॉचवर संशोधन केले.

स्मार्ट वॉच आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी वापरता? ते कॅन्सरला निमंत्रण देऊ शकते, नवा रिसर्च डोळे उघडेल
आजकाल जुन्या घडाळ्यांचा ट्रेंड गेला असून आता विविध सेंसर असलेल्या स्मार्ट वॉचचा ट्रेंड आला आहे. याद्वारे ब्लड प्रेशर, शरीरातील ऑक्सिजन लेव्हल याचबरोबर तुम्ही किती एक्सरसाईज केली, रनिंग, किती चालला आदी अनेक गोष्टी नोंदविल्या जातात. परंतू, याच स्मार्टवॉचवर आलेल्या एका अभ्यासावर तुमचे डोळे उघडणार आहेत.
स्मार्टवॉचमुळे तुमचे आरोग्य सुधारेल यापेक्षा बिघडेल असा हा रिसर्च आहे. अमेरिकेच्या नॉर्ट्रे डॅम विद्यापीठाने बाजारात विकल्या जाणाऱ्या २२ स्मार्टवॉच ब्रँडच्या स्मार्टवॉचवर संशोधन केले. या पैकी १५ स्मार्टवॉचमध्ये कॅन्सर होऊ शकणारे धोकादायक केमिकल सापडले आहेत. या केमिकल्सना फॉरेव्हर केमिकल असे नाव देण्यात आले आहे.
ही रसायने पर्यावरणात अनेक वर्षे राहतात आणि विघटन होण्यास देखील खूप काळ घेतात. स्मार्टवॉचचा रबर बँड बनवण्यासाठी फ्लोरोइलास्टोमर रबर वापरला जातो. रबर बँडमध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्लोरोइलास्टोमर संयुगामुळे कर्करोग होऊ शकतो असे शास्त्रज्ञांना आढळले आहे. रबर बँडमध्ये त्याची घनता १% पेक्षा कमी जरी असली तरी ती माणसाला कॅन्सर होण्यास पुरेशी असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
स्मार्टवॉचचे रबर बँड बनवण्यासाठी ४० टक्के रसायनांचा वापर केला जातो. ते बनवण्यासाठी, अशी रसायने वापरली जातात जी कार्पेट, कागद आणि कीटकनाशकांमध्ये देखील आढळतात. या रसायनांमुळे यकृताच्या आजाराचा धोका असतो. या संशोधनाने डोळे उघडल्याने युरोपियन युनियनने फ्लोरोइलास्टोमर संयुगांपासून बनवलेल्या ग्राहकोपयोगी उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
पॉलीफ्लुरोआल्किल पदार्थ (PFAS) हे अन्य घरगुती वस्तूंवरही आढळते. फास्ट-फूड रॅपर्स आणि मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न बॅग्ज, सॉफ्ट रबरची उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये देखील ते वापरले जाते. हा पदार्थ पाण्याद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो.