शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

आता WhatsApp वरुन HD क्वालिटीचे फोटो पाठवता येणार; फक्त ही सेटींग करा, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 15:11 IST

WhatsApp आपल्या आयुष्यातील एक महत्वाचे घटक झाले आहे. दर मिनिटाला व्हॉट्सअ‍ॅप चेक करण्याची सवय सध्या अनेकांना लागली आहे.

WhatsApp आपल्या आयुष्यातील एक महत्वाचे घटक झाले आहे. दर मिनिटाला व्हॉट्सअ‍ॅप चेक करण्याची सवय सध्या अनेकांना लागली आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर कामासाठीही केला जात आहे. व्हॉट्सअॅपने बिझनेस अ‍ॅपही आणले आहे. त्यामुळे अनेकांनी या प्लॅफॉर्मचा वापर बिझनेससाठी केला आहे, यावरुन फोटो पाठवले जातात. पण, आता पाठवलेले फोटो खराब क्वालिटीचे जातात, आता व्हॉट्सअ‍ॅपने एक नवे फिचर लाँच केले आहे. यावरुन आपण HD क्वालिटीचे  फोटो पाठवू शकतो. हे फिचर आपल्याला फक्त सेटींग करुन सुरू करायचे आहे. चला जाणून घेऊया हे फिचर सुरू कसे करायचे.  

आतापर्यंत आपण व्हॉट्सअॅपववरुन कमी गुणवत्तेचे फोटो आपोआप पाठवत होतो, कारण डेटाचा वापर कमी होईल आणि मेसेज लवकर पाठवता येईल म्हणून आपण कमी क्वालिटीचा फोटो पाठवत होतो. आता तुम्ही ते फोटो हव्या त्या क्वालिटीचे हवे तसे पाठवू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही व्हॉट्सअॅपवर उच्च दर्जाचे फोटोही पाठवू शकता. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन काही बदल करावे लागतील.

WhatsApp चं जबरदस्त फिचर! आता स्वत:लाही मेसेज करता येणार, नेमकं काय आहे जाणून घ्या...

पहिल्यांदा तुम्हाला WhatsApp ओपन करावे लागेल. येथे वर दिलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. आता तुमच्या समोर अनेक पर्याय दिसतील, यामध्ये तुम्ही सेटिंगवर क्लिक करा.

सेटिंग्जमध्ये तुम्हाला स्टोरेज आणि डेटामध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला फोटो अपलोड क्वालिटीचा पर्याय दिसेल. यावर क्लिक करा तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये तीन पर्याय उपलब्ध असतील. पहिला पर्याय ऑटो आहे, जो डीफॉल्टनुसार निवडला जाईल.

याशिवाय तुम्हाला डेटा सेव्हर आणि बेस्ट क्वालिटीचा पर्याय मिळेल. ऑटो ऑप्शनवर नेटवर्क क्वालिटीनुसार फोटो पाठवले जातील. फोनमध्ये येणाऱ्या डेटानुसार अॅप फोटो पाठवेल. हाच पर्याय महत्वाचा आणि फायद्याचा आहे. जर तुम्हाला चांगल्या गुणवत्तेत फोटो पाठवायचे असतील तर तुम्ही सर्वोत्तम गुणवत्ता निवडू शकता. त्यासाठी थोडा अधिक डेटा खर्च होतो. यासाठी तुमच्या इंटरनेटच स्पीड जास्त असणे हेही गरजेचे आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडिया