सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लसवर डिस्काऊंट

By शेखर पाटील | Updated: March 8, 2018 15:44 IST2018-03-08T15:44:29+5:302018-03-08T15:44:29+5:30

जानेवारी महिन्याच्या प्रारंभी सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हे मॉडेल लाँच करण्यात आले होते.

Discount on Samsung Galaxy A8 Plus | सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लसवर डिस्काऊंट

सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लसवर डिस्काऊंट

जानेवारी महिन्याच्या प्रारंभी सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हे मॉडेल लाँच करण्यात आले होते. याच्या ६ जीबी रॅमयुक्त व्हेरियंटचे मूल्य ३२,९९९ रूपये होते. आता हाच स्मार्टफोन ग्राहकांना २८,९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. यात ६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा (२२०० बाय १०८० पिक्सल्स) सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज असून ते मायक्रो एसडी कार्डने वाढविणे शक्य आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस या स्मार्टफोनमध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. याच्या पुढील बाजूस एफ/१.९ अपार्चर आणि लाईव्ह फोकस या फिचरने सज्ज असणारे १६ व ८ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. यांच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या सेल्फी घेता येतात. तर एफ/१.७ अपार्चरसह यातील मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सल्सचा असेल. युएसबी टाईप-सी चार्जींग प्रणालीसह यातील बॅटरी ३५०० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असल्याने कोणत्याही वातावरणात सहजपणे वापरणे शक्य आहे. कॉन्टॅक्टलेस मोबाईल पेमेंटसाठी यात सॅमसंग पे ही प्रणाली देण्यात आलेली आहे. याला सॅमसंग गिअर व्हिआर हेडसेटचा सपोर्टदेखील देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्स असतील. तसेच या स्मार्टफोनमध्ये  अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. 

Web Title: Discount on Samsung Galaxy A8 Plus