शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

Facebook किंवा Twitter वर चुकूनही करू नका 'हे' काम; पोलिसांनी दिला इशारा

By जयदीप दाभोळकर | Updated: January 18, 2021 15:01 IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार केल्यास बसू शकतो मोठा फटका

ठळक मुद्देदिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम ब्रांचनं ट्वीट करत दिली माहितीईमेलद्वारे किंवा कस्टमर केअर क्रमांकावर तक्रार करण्याचं पोलिसांचं आवाहन

आजकाल सोशल मीडियाचा वापर आपण सर्वच जण करत आहोत. फेसबुक, ट्विटरसारख्यासोशल मीडियाचा वापरही आपण करत आहोत. आपण अनेकदा या प्लॅटफॉर्म्सवर रिव्ह्यूदेखील देत असतो. जर तुम्ही असं काही करत असाल तर पोलिसांनी एक इशारा दिला आहे. जर तुम्ही खराब वस्तू किंवा कोणत्या सर्व्हिसबाबत सोशल मीडियावर व्यक्त होत असाल तर दिल्ली पोलिसांनी एक इशारा दिला आहे. ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवर आपल्या समस्या पोस्ट केल्यानंतर त्यामुळे आपली फसवणुकदेखील होऊ शकते. अशा तक्रारी केल्यानंतर काही स्कॅमर्स युझर्सना कस्टमर केअर एक्सिक्युटिव्ह बनून संपर्क साधतात. त्यानंतर त्यांची खासगी माहिती मिळवली जाते. यामुळे ना केवळ युझर्सचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी मिळू शकतो, इतकंच काय संबंधितांच्या खात्यातून पैसेही चोरले जाऊ शकतात. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलनं ट्विटरच्या माध्यमातून यासंबंधीची माहिती दिली आहे. तसंच त्यांनी सतर्क राहण्याचं आवाहनही केलं आहे. "फ्रॉड अलर्ट... तुम्ही सार्वजनिक मंचांवर आपल्या तक्रारी पोस्ट करता?  जर तुम्ही वॉलेट, बँक अॅप्स आणि एअरलाईन्ससारख्या कंपन्यांना तक्रारी लिहित असाल तर तुमची फसवणुकही होऊ शकते. याद्वारे कोणतीही व्यक्ती त्या तक्रारींचा हवाला देऊन कस्टमर केअर एक्सिक्य़ुटिव्ह म्हणून तुम्हाला कॉल करू शकतो," असं दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम ब्रान्चनं म्हटलं आहे. दरम्यान, ग्राहकांना कोणतीही तक्रार किंवा समस्या मांडायच्या असतील तर संबंधित कंपनीच्या ईमेल आयडीवर किंवा त्यांच्या कस्टमर केअरवर संपर्क केला पाहिजे. याव्यतिरिक्त कोणतीही बँक, वॉलेट किंवा एअरलाईन कंपनी ग्राहकांची गोपनीय माहिती रिफंड करण्यासाठी विचारत नाही. याव्यतिरिक्त ग्राहकांना त्यांचा एटीएम पिन आणि पासवर्डदेखील शेअर करण्यास सांगितलं जात नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :FacebookफेसबुकTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडियाcyber crimeसायबर क्राइमbankबँकonlineऑनलाइन