शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
3
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
4
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
5
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
6
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
7
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
8
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
9
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
10
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
11
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
12
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
13
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
14
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
15
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
16
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
17
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
18
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
19
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Live Updates : कोरोनाशी लढण्यासाठी Twitter चा पुढाकार; तब्बल 110 कोटींची केली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 12:34 IST

Twitter donates Rs 110 crores to 3 NGOs to help fight Covid-19 in India : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने कोरोनाशी लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ट्विटरने 15 मिलियन डॉलर्स म्हणजेच 110 कोटींची मदत जाहीर केली आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दोन कोटींहून अधिक झाली आहे. कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी अनेक राजकीय नेते पुढे सरसावले आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी आता ट्विटरने (Twitter) देखील भारताला मदतीचा हात दिला आहे. 

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने कोरोनाशी लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ट्विटरने 15 मिलियन डॉलर्स म्हणजेच 110 कोटींची मदत जाहीर केली आहे. ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डोर्सी यांनी सोमवारी ट्विट करून याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. "ही रक्कम केअर (CARE), एड इंडिया (Aid India) आणि सेवा इंटरनेशनल यूएसए (Sewa Internationa USA) या तीन संस्थांना दान करण्यात आली आहे. यामध्ये केअरला 1 कोटी डॉलर्स तर एड इंडिया आणि सेवा इंटरनॅशनल यूएसएला अडीच मिलियन डॉलर्स देण्यात आले आहेत" असं म्हटलं आहे. 

ट्विटरने आपल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, सेवा आंतरराष्ट्रीय ही हिंदू विश्वास-आधारित, मानवतावादी, ना-नफा सेवा संस्था आहे. हे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, व्हेंटिलेटर, बीआयपीएपी (बिलीवेल पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर) आणि सीपीएपी (सतत पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर) मशीन सारख्या जीवनरक्षक उपकरणांच्या खरेदीसाठी मदत करणार आहे. तसेच केअरल्या मिळालेल्या फंडातून कोविड केअर सेंटर तयार केले जाणार आहेत. यासोबतच ऑक्सिजन, पीपीई किट आणि अन्य आवश्यक सामानाची खरेदी केली जाणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 

भारीच! Twitter ने आणलं भन्नाट फीचर, आता झटपट पैसे पाठवता येणार, व्यवहार करणं सोपं होणार

जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या ट्विटरने (Twitter) आता आणखी एक नवीन आणि जबरदस्त फीचर आणलं आहे. यामुळे युजर्सचा फायदा होणार आहे. यापूर्वी ट्विटरने आपल्या सर्व युजर्ससाठी Twitter Spaces फीचर्स आणलं होतं. त्यानंतर आता आणखी एक फीचर आणलं असून Tip Jar असं त्याचं नाव आहे. Twitter Tip Jar हे अँड्रॉईड आणि आयओएस दोन्हीवर सहज वापरता येणार आहे. मात्र सध्या हे फीचर फक्त काही निवडक लोकांसाठीच आहे. या फीचरचा लाभ निवडक पत्रकार, तज्ञ आणि निर्माते घेऊ शकणार आहेत. नंतर लवकरच ही सेवा सामान्य युजर्ससाठी देखील सुरू करण्यात येणार आहे. 

ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर ट्विटरवर पैसे पाठविण्याचा आणि प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. आहे. या फीचरवर क्लिक करून युजर्सना Bandcamp, Cash App, Patreon, PayPal आणि Venmo सारख्या ट्रान्झॅक्शन Apps दिसतील ज्याद्वारे युजर्सर टिप करू शकतील. पैशांच्या व्यवहाराच्या बाबतीत ते युजर्सकडून पैसे घेणार नाहीत. ट्विटरने युजर्स अनेकदा त्यांच्या प्लॅटफॉर्मवर फॉलो, रिट्वीट करतात, लाईक्स करतात असं म्हटलं आहे. त्यानंतर आता टीप-जारद्वारे पैसे देऊ शकणार आहेत. हे फीचर आता सध्या इंग्रजीमध्ये असून लवकरच ते इतर भाषांमध्ये देखील उपलब्ध होईल.

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTwitterट्विटरIndiaभारतtechnologyतंत्रज्ञान