Coronavirus how long coronavirus can live on a smartphone SSS | Coronavirus : कोरोना अलर्ट! स्मार्टफोनवर इतका वेळ जिवंत राहू शकतो कोरोना, वेळीच व्हा सावध

Coronavirus : कोरोना अलर्ट! स्मार्टफोनवर इतका वेळ जिवंत राहू शकतो कोरोना, वेळीच व्हा सावध

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. देशात कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे घरामध्ये इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे. अनेक जण गेम खेळण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठी, फोन करण्यासाठी सध्या स्मार्टफोनचा अधिक वापर करत आहे. मात्र स्मार्टफोन युजर्सनाही कोरोनाचा धोका असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. कोरोना व्हायरस हा स्मार्टफोनवर जिवंत राहू शकत असल्याची माहिती नव्या रिसर्चसमधून समोर आली आहे.

स्मार्टफोन सध्याची गरज झाली असून लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांच्याच हातात तो हमखास दिसतो. अनेक ठिकाणी स्मार्टफोन हा ठेवला जातो. सध्या कोरोनाचा प्रसार हा वेगाने होत असताना कोरोना व्हायरस स्मार्टफोनवर किती वेळ राहू शकतो याबाबत अनेक युजर्सकडून प्रश्न विचारला जात होता. या संदर्भात आता एक रिसर्च समोर आला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या एका अभ्यासानुसार, ओरिजनल SARS-CoV एक ग्लास सर्फेसवर 96 तास म्हणजेच 4 दिवस जिवंत राहू शकतो. 2003 मध्ये सार्स व्हायरस आला होता. ग्लास शिवाय हा व्हायरस प्लास्टिक आणि स्टिलवर जवळपास 72 तास जिवंत राहू शकतो.

युनायटेड स्टेट्सच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थच्या अभ्यासात नॉवल कोरोना व्हायरस एका कार्डबोर्डवर 24 तास आणि तांब्यावर 4 तास जिवंत राहू शकतो. संस्थेच्या एका नव्या अभ्यासातून कोरोना व्हायरस ग्लासवर किती दिवस जिवंत राहू शकतो याबाबत माहिती समोर आली आहे. सार्सप्रमाणे कोरोना देखील ग्लास सर्फेसवर 4 दिवस जिवंत राहू शकतो. 2003 मध्ये WHO आणि या महिन्यात आलेल्या NIH च्या अभ्यासानुसार, नॉवल कोरोना व्हायसर ग्लास सर्फेसवर 96 तास म्हणजेच 4 दिवस जिवंत राहू शकतो. सध्या स्मार्टफोन्सवरील ग्लास हे पॅनेलसोबत येतात. फक्त स्मार्टफोनच नाही तर स्मार्टवॉच, टॅबलेट किंवा लॅपटॉपसारख्या ग्लास सर्फेस असलेल्या उपकरणांवर देखील कोरोना जिवंत राहू शकतो. त्यामुळे काळजी घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी स्मार्टफोन हा वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे.

लॉकडाऊनमुळे काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. व्हिडीओ कॉलच्या मदतीने ऑफिसमधील लोकांशी महत्त्वाची चर्चा करता येते. अनेक अ‍ॅपवर मर्यादित लोकांना एकाच वेळी व्हिडिओ कॉल करता येणं शक्य आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मात्र यावर उपाय  म्हणून गुगलने युजर्ससाठी पुढाकार घेतला आहे. व्हिडिओ कॉलची गंमत आता आणखी वाढणार असून एकाच वेळी 12 जणांशी गप्पा मारता येणार आहेत. गुगलने आपलं व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप असणाऱ्या गुगल ड्युओ (Google Duo) वर एकाच वेळेस व्हिडिओ कॉल करता येणाऱ्या युजर्सची संख्या वाढवली आहे. त्यामुळे गुगल ड्युओच्या माध्यमातून एकाच वेळी आता 12 जणांना व्हिडिओ कॉल करता येणार आहे. याआधी ही मर्यादा आठ होती. गुगलचे वरिष्ठ मार्गदर्शक (प्रोडक्ट मॅनेजमेंट) सनाज अहरी लेमेलसन यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

 महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : लय भारी! व्हिडिओ कॉलची गंमत आणखी वाढणार, एकाच वेळी 12 जणांशी गप्पा मारता येणार

Coronavirus : आता 14 नाही तर 28 दिवसांचे होम आयसोलेशन, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय

Coronavirus : हृदयद्रावक! चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमीची पायपीट

Coronavirus : धक्कादायक! कोरोना संशयितांची माहिती दिली म्हणून तरुणाची हत्या

coronavirus : जगभरात कोरोनामुळे 37 हजार जण मृत्युमुखी, अमेरिका, इटलीमध्ये भीषण परिस्थिती

 

Web Title: Coronavirus how long coronavirus can live on a smartphone SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.