एकाचवेळी एक स्मार्टफोन अन् तीन इअर बड्स; मोठ्या तयारीत येतेय ही कंपनी... कधी आहे लाँचिंग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:32 IST2025-04-08T16:31:40+5:302025-04-08T16:32:22+5:30
Nothing: नथिंग फोन ३ सिरीजचे दोन फोन नुकतेच लाँच केलेले आहेत. अशातच आता सीएमएफच्या नावाखाली आणखी एक फोन CMF Phone 2 Pro आणण्याची तयारी सुरु केली आहे.

एकाचवेळी एक स्मार्टफोन अन् तीन इअर बड्स; मोठ्या तयारीत येतेय ही कंपनी... कधी आहे लाँचिंग?
नथिंग या युरोपियन कंपनीचा ब्रँड असलेला सीएमएफ बऱ्याच काळाने नवीन फोन घेऊन येत आहे. नथिंगने यापूर्वी नथिंग फोन २ आणि ३ सिरीज लाँच केलेली आहे. नथिंग फोन ३ सिरीजचे दोन फोन नुकतेच लाँच केलेले आहेत. अशातच आता सीएमएफच्या नावाखाली आणखी एक फोन CMF Phone 2 Pro आणण्याची तयारी सुरु केली आहे.
सीएमएफ फोन २ प्रोचा हा फोन एप्रिलच्या अखेरीस लाँच होणार आहे. याची अपेक्षित किंमत २२००० रुपये असण्याचा अंदाज आहे. २८ एप्रिलला सायंकाळी साडे सहा वाजता हा फोन लाँच केला जाईल. याचबरोबर सीएमएफ बड्स २, बड्स २ ए आणि बड्स २ प्लस असे तीन इअर बड्स देखील यावेळी लाँच केले जाणार आहेत.
यानंतर स्मार्टफोन बाजारात नथिंगचे तीन फोन आणि तीन बड्स असणार आहेत. नथिंगला इअर बड्समध्ये विस्तार करण्याचा विचार दिसत आहे. परडवडणाऱ्या किंमतीतील हा मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन असणार आहे. यामध्ये FHD+ AMOLED डिस्प्ले, मेडियाटेक डायमेन्सिटी ७४०० चिपसेट आणि ८/256 GB स्टोरेज असण्याची शक्यता आहे.
यामध्ये ट्रिपल कॅमेरा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. टिझरमध्ये तसे दिसले आहे. यापैकी एक ५० मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स असू शकते. तसेच ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो. सीएमएफचा यापूर्वी फोन १ आला होता, त्याची किंमत १४९९९ रुपये ठेवण्यात आली होती. आता फोन २ ऐवजी प्रो असे नामकरण करण्यात आले आहे.
नथिंगच्या नावावर सध्या दोन नथिंग फोन ३ आणि ३ ए बाजारात आहेत. या फोनची किंमत अनुक्रमे २४९९९ ते ३४९९९ पर्यंत आहे. या किंमतीपेक्षा कमी किंमतीत सीएमएफचा नवा फोन उपलब्ध होण्याची शक्यता आहे.