अरे व्वा! 'या' मेड इन इंडिया अ‍ॅपने सुरू केला जबरदस्त शो; युजर्सना तब्बल 1 कोटी जिंकण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 09:27 AM2020-07-18T09:27:49+5:302020-07-18T09:30:16+5:30

मेड इन इंडिया अ‍ॅपची लोकप्रियता वाढू लागली आहे. याच दरम्यान आता स्मार्टफोन युजर्सना तब्बल एक कोटी जिंकण्याची संधी एका अ‍ॅपने दिली आहे. 

chingari app launches chingari star talent ka mahasangram | अरे व्वा! 'या' मेड इन इंडिया अ‍ॅपने सुरू केला जबरदस्त शो; युजर्सना तब्बल 1 कोटी जिंकण्याची संधी

अरे व्वा! 'या' मेड इन इंडिया अ‍ॅपने सुरू केला जबरदस्त शो; युजर्सना तब्बल 1 कोटी जिंकण्याची संधी

googlenewsNext

नवी दिल्ली - शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ होती. मात्र केंद्रातील मोदी सरकारने चीनला मोठा दणका दिला. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राऊझर आणि हॅलो अ‍ॅप यासारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे. यानंतर आता मेड इन इंडिया अ‍ॅपची लोकप्रियता वाढू लागली आहे. याच दरम्यान आता स्मार्टफोन युजर्सना तब्बल एक कोटी जिंकण्याची संधी एका अ‍ॅपने दिली आहे. 

चिंगारी असं या अ‍ॅपचं नाव असून भारतात TikTok वर बंदी आल्यानंतर भारतीय शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप Chingari ला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  चिंगारी या कंपनीने आता स्टार्स: टॅलेंटचा महासंग्राम (Chingari Stars: Talent Ka Mahasangram) नावाचा पहिला डिजिटल टॅलेंट हंट शो सुरू केला आहे. यामध्ये जिंकणाऱ्या सर्वोत्कृष्ट कंटेंन्ट क्रिएटरला 1 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. त्याचबरोबर देशातील प्रत्येक राज्यातील सर्वोत्कृष्ट कंटेंन्ट क्रिएटरला 5 लाख रुपये मिळणार आहेत. 

चिंगारी अ‍ॅपचे सहसंस्थापक सुमित घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील लोकांच्या कलागुणांना वाव देणं हा या खास कार्यक्रमामागचा उद्देश आहे. हा कार्यक्रम राज्य आणि राष्ट्रीय दोन स्तरांवर असणार आहे. या शोमध्ये युजर्स आपले डान्स, गाणी, अभिनय, मिमिक्री, कॉमेडी आणि इनोव्हेशन करत आपले व्हिडिओ अपलोड करू शकतात. कोणीही या शोमध्ये भाग घेऊ शकतं. शोमध्ये भाग घेणार्‍या प्रत्येक भाग घेणाऱ्याला 15-60 सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करावा लागणार आहे. यानंतर, कंटेंन्टनुसार व्हिडिओ शॉर्ट-लिस्ट केले जाणार. 

चिंगारी अ‍ॅपमध्येच यासाठी वोटिंग करण्यात येणार आहे. यानंतर, उत्तम आणि सगळ्यात जास्त मत मिळालेल्या युजर्सला चिंगारीकडून टॅलेंट का महासंग्राम अंतर्गत तब्बल एक कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येईल. शोमध्ये भाग घेण्यासाठी सर्वप्रथम मोबाईलवर चिंगारी अॅप डाऊनलोड करा आणि प्लॅटफॉर्मवर आपलं प्रोफाईल तयार करा. यानंतर कॅटेगरी निवडा. तुमचा कोणताही 15 ते 60 सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करा. यानंतर तुम्हाला व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करावा लागेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कसे आहे अ‍ॅप...

चिंगारीवर व्हिडिओ अपलोड, डाऊनलोड केले जाऊ शकतात. याशिवाय यामध्ये मित्रांशी चॅटिंग, नवीन लोकांशी मैत्री, चॅटिंग, ब्राऊझिंगसह व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, ऑडिओ क्लिप्स, GIF स्टीकर आणि फोटोंसोबत क्रिएटिव्हीटी केली जाऊ शकते.


 

महत्त्वाच्या बातम्या

...अन् भाजपाच्या नगरसेविकेने भर सभेत आयुक्तांना फेकून मारली चप्पल, Video व्हायरल 

CoronaVirus News : कोरोनाला रोखण्यात यश! हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' राज्याने लगावला आनंदाचा 'सिक्सर'

CoronaVirus News : काय सांगता? मास्क लावायला विसरल्या मंत्री, भीतीने केलं असं काही...; Video व्हायरल

भयंकर! चॅनल बदलण्यासाठी रिमोटचा हट्ट बेतला जीवावर, 7 वर्षांच्या चिमुकलीची हत्या

CoronaVirus News : त्या तिघांनी दिले पाचशेहून अधिक कोरोनारुग्णांना जीवनदान

बापरे! बेडच्या बॉक्समध्ये चुकून लॉक झाल्या आजी अन्..; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

 

Web Title: chingari app launches chingari star talent ka mahasangram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.