शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

चीनला घाबरली Apple कंपनी? सप्लायर्सना दिली वॉर्निंग, Made In Taiwan लेबल नको! नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 14:41 IST

China Taiwan Crisis: चीन आणि तैवानमधील तणावाचे पडसाद आता जागतिक बाजारपेठेवर पाहायला मिळत आहेत. दोन्ही देश स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांसाठी महत्वपूर्ण आहेत.

China Taiwan Crisis: चीन आणि तैवानमधील तणावाचे पडसाद आता जागतिक बाजारपेठेवर पाहायला मिळत आहेत. दोन्ही देश स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांसाठी महत्वपूर्ण आहेत. नुकतंच अमेरिकेच्या स्पीकर नेन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. तैवानची घेराबंदी करुन चीन फायर ड्रील करत आहे. 

दोन्ही देशांमधील तणावामुळे कंपन्यांना व्यापारासंबंधी आता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिग्गज स्मार्टफोन कंपनी Apple नं आपल्या पुरवठादारांना चीनच्या नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीनं तैवानहून चीनला जाणाऱ्या शिपमेंटसाठी चीनी नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. चीननं तैवानमध्ये उत्पादन केल्या जाणाऱ्या पार्ट्सवर कठोर निर्बंध लावण्यास सुरुवात केली असल्याचं अ‍ॅपल कंपनीनं म्हटलं आहे. 

चीनच्या नियमांचं पालन करा- अ‍ॅपल कंपनीचा आदेशसुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अ‍ॅपलनं आपल्या सर्व पुरवठादारांना वॉर्निंग दिली आहे. तैवानहून चीनला जाणाऱ्या आपल्याशी निगडीत सर्व पार्ट्स आणि उत्पादनांवर एकतर 'तैवान-चीन' किंवा 'चीनी तैपेई' असा लेबल ठेवा, असं Apple कंपनीनं आपल्या पुरवठादारांना सांगितलं आहे. कंपनीनं तातडीनं याबाबतचं पालन करण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन कंपनीनं आयात केलेल्या सामान आणि उत्पादनांची वर्गवारी करताना कोणतीही अडचणी येणार नाही. 

iPhone 14 सीरिजची लॉन्चिंग रखडणार?पुढील महिन्यात कंपनी iPhone 14 सीरिज आणि इतर प्रोडक्ट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यातच चीन आणि तैवानमधील तणावाचा परिणाम पुरवठ्यावर होऊ शकतो. त्यामुळे कंपनीच्या आगामी उत्पादनांच्या लॉन्चिंगवरही याचा परिणाम पाहायला मिळू शकतो. 

सुत्रांच्या माहितीनुसार इंपोर्टेड डिक्लेरेशन फॉर्म, डॉक्युमेंट किंवा बॉक्सवर Made In Taiwan लेबल असल्यास चीनच्या कस्टम विभागाकडून कठोर तपासणीला सामोरं जावं लागणार आहे. तसंच नियमांचं उल्लंघन झाल्यास ४ हजार युआन (जवळपास ४७ हजार रुपये) दंड आकारला जाऊ शकतो. तसंच शिपमेंट देखील रोखलं जाऊ शकतं. 

टॅग्स :Apple IncअॅपलchinaचीनIndiaभारत