भिंतीवर किंवा खिडकीत फिट करण्याची गरज नाही! मोठी बचत करतील 'हे' पोर्टेबल एसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 16:16 IST2022-04-15T16:13:11+5:302022-04-15T16:16:42+5:30
पोर्टेबल एयर कंडीशनरचे अनेक फायदे असतात. हे एसी तुम्ही हव्या त्या रूममध्ये सहज नेऊ शकता.

भिंतीवर किंवा खिडकीत फिट करण्याची गरज नाही! मोठी बचत करतील 'हे' पोर्टेबल एसी
एसी विकत घ्यायचा म्हणजे खूप गोष्टींचा विचार करावा लागतो. कोणत्या खोलीत एसी लावायचा? कुठली भिंत किंवा खिडकी एसीसाठी योग्य ठरेल? असे अनेक झंझट असतात. जर तुम्हाला एवढा ताण घायचा नसेल. किंवा तुम्ही सतत घर बदलत असाल तर तुम्ही एक पोर्टेबल एसी विकत घेऊन तुमची इन्स्टॉलेशन कॉस्ट वाचवू शकता.
एक पोर्टेबल एसी सामान्य एसी प्रमाणे तुमची खोली थंड करतो. तुम्हाला तुमच्या घराच्या डिजाईनमध्ये जास्त बदल करायचा नसेल, तुम्ही घर सतत बदलत असाल तर तुमच्यासाठी हा पर्याय योग्य ठरू शकतो. पोर्टेबल एयर कंडीशनरचा खर्च देखील कमी असतो कारण यात इन्स्टॉलेशन चार्जेस द्यावे लागत नाहीत. तसेच स्प्लिट एयर कंडीशनर पेक्षा कमी वीज देखील वापरली जाते. पुढे आम्ही काही पोर्टेबल एसीची माहिती दिली आहे.
LLoyd Portable AC 1.0 (LP12B01TP): यात 2वे स्विंगसह हाय एफिशियंसी कूलिंग ट्यूब देण्यात आली आहे. हा एसी ऑटो रिस्टार्ट फिचरला सपोर्ट करतो. 39,990 रुपयांच्या ऐवजी हा एसी 28,990 रुपयांमध्ये विका जात आहे. ईएमआयचा पर्याय देखील मिळत आहे. यावर एक वर्षाची वॉरंटी मिळते.
Blue Star 1 Ton Portable AC: हा हाय एफिशियंसी रोटेरी कंप्रेसरसह येतो. यावर अँटी-बॅक्टीरियल सिल्वर कोटिंग देण्यात आली आहे. हा 1 टनाचा एसी आहे ज्यात ऑटो मोड देखील देण्यात आला आहे. एसीवर 12 महिन्यांची तर कंप्रेसरवर 5 वर्षांची वॉरंटी मिळते. हा एसी Flipkart आणि Croma वरून विकत घेता येईल. 39,000 रुपयांचा हा एसी सध्या 29,890 रुपयांमध्ये विकला जात आहे. जुना एसी एक्सचेंज करून तुम्ही 4,480 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. तसेच 1,407 रुपयांच्या हप्त्यावर देखील हा एसी घरी आणता येईल.