लॉन्च झाला सर्वात स्वस्त Ai स्मार्टफोन, किंमत फक्त 5000 रुपये; पाहा फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 14:59 IST2025-07-08T14:58:52+5:302025-07-08T14:59:21+5:30

यामध्ये 5000mAh बॅटरी, 128 स्टोरेज अन् 50MP चा कॅमेरा मिळतो.

cheapest AI smartphone launched, priced at just Rs 5000; See features | लॉन्च झाला सर्वात स्वस्त Ai स्मार्टफोन, किंमत फक्त 5000 रुपये; पाहा फीचर्स...

लॉन्च झाला सर्वात स्वस्त Ai स्मार्टफोन, किंमत फक्त 5000 रुपये; पाहा फीचर्स...

AI+ ने भारतात दोन स्वस्त स्मार्टफोन (पल्स आणि नोव्हा 5G) लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फोन फीचर फोनच्या किमतीत मिळतील. Realme चे माजी CEO आणि NextQuantum चे संस्थापक माधव सेठ यांनी हे दोन्ही फोन भारतात AI+ ब्रँड अंतर्गत लॉन्च केले असून, याची किंमत 4,999 रुपयांपासून सुरू होते. AI+ Pulse आणि Nova 5G मध्ये 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरासारखे फीचर्स आहेत.

सर्वात स्वस्त स्मार्टफोन
AI+ Pulse आणि Nova 5G दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फोन ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वरुन खरेदी करता येतील. AI+ Pulse 4GB RAM + 64GB आणि 6GB RAM + 128GB मध्ये सादर केले आहेत. याची सुरुवातीची किंमत 4,999 रुपये, तर टॉप व्हेरिएंट 6,999 रुपये आहे.

AI+ Nova 5G 6GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 128GB मध्ये लॉन्च केला आहे. याची सुरुवातीची किंमत 7,999 रुपये आहे. तर, त्याचा टॉप व्हेरिएंट 9,999 रुपयांना येतो. AI+ च्या या दोन्ही फोनची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत AI फीचर्स मिळतील. या दोन्ही फोनची पहिली सेल 12 जुलै रोजी होणार आहे. कंपनी फोनच्या खरेदीवर 500 रुपयांची मर्यादित सूट देत आहे.

AI+Pulse
हा स्वस्त स्मार्टफोन 6.745 इंचाचा HD+ डिस्प्लेसह येतो. हा 90Hz रिफ्रेश रेट आणि 450 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल. हा फोन Unisoc T615 प्रोसेसर, 5000mAh पॉवरफुल बॅटरीसह येतो. हा 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. फोनच्या मागील बाजूस AI ड्युअल कॅमेरा उपलब्ध आहे. यात 50MP चा मुख्य आणि एक सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 5MP चा कॅमेरा उपलब्ध आहे.

AI+ Nova 5G
या स्वस्त 5G स्मार्टफोनमध्ये 6.745-इंचाचा HD+ डिस्प्ले देखील आहे. तो 90Hz रिफ्रेश रेट आणि 450 nits पर्यंत पीक ब्राइटनेसला देखील सपोर्ट करेल. यात Unisoc T8200 5G प्रोसेसर आणि 5000mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे. हे 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजला सपोर्ट करेल. त्याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. त्याच्या मागील बाजूस AI ड्युअल कॅमेरा देखील असेल, ज्यामध्ये 50MP मुख्य आणि एक दुय्यम कॅमेरा असेल. सेल्फीसाठी यात 5MP कॅमेरा असेल.

Web Title: cheapest AI smartphone launched, priced at just Rs 5000; See features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.