आता एवढंच बाकी होतं! ChatGPT ची पॉर्नकडे वाटचाल? कंपनीच्या प्रमुखावर टीकेची झोड...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:00 IST2025-10-15T17:00:14+5:302025-10-15T17:00:22+5:30
ChatGPT New Feature : कंपनीचे प्रमुख सॅम ऑल्टमन यांनी ChatGPT मध्ये एक नवीन फीचर आणले आहे.

आता एवढंच बाकी होतं! ChatGPT ची पॉर्नकडे वाटचाल? कंपनीच्या प्रमुखावर टीकेची झोड...
ChatGPT New Feature : आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या जगात खळबळ उडवून देणाऱ्या OpenAI चे सहसंस्थापक सॅम ऑल्टमन यांच्यावर बरीच टीका होत आहे. त्यांनी ChatGPT मध्ये नवीन फीचर आणले आहे. त्यांच्या या नवीन प्रस्तावित एडल्ट / इरोटिक फीचरमुळे वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेतील अनेकांनी या गैरवापराविरुद्ध निषेध नोंदवला. यात भारतीय वंशाचे रिपब्लिकन राजकारणी विवेक रामास्वामी यांचाही समावेश आहे.
विवेक रामास्वामी हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानले जातात. विवेक रामास्वामी यांनी ओपनएआय आणि त्याचे संस्थापक अल्टमन यांच्यावर टीका करताना म्हटले की, चॅटजीपीटीचे नवीन फीचर प्रौढांना एडल्ट किंवा इरोटीक कंटेट मिळवून देण्यास मदत करेल. डिसेंबरमध्ये लॉन्च होणारे चॅटजीपीटीचे फीचर मानसिक ताण कमी करण्यासाठी आणल्याचे कंपनीचे म्हणने आहे.
यामुळे काय मिळेल?
रामास्वामी म्हणाले की, हे नवीन चॅटजीपीटी फीचर भविष्यात आणखी समस्या निर्माण करू शकते. यामुळे उत्पादकतेत कोणते फायदे होतील हे स्पष्ट नाही. एआयचे अनावश्यक मानवीकरण केवळ समस्या निर्माण करेल. हे नवीन फीचर उत्पादकता वाढविण्यात कोणत्याही प्रकारे उपयुक्त ठरणार नाही. उलट, ते व्यसन आणि एकाकीपणाला प्रोत्साहन देईल, ज्यामुळे शेवटी नैराश्य आणि तणाव निर्माण होईल.
काय आहे नवीन फीचर ?
ओपनएआयचे संस्थापक सॅम ऑल्टमन यांनी अलीकडेच घोषणा केली की, चॅटजीपीटी युजर्सना लवकरच एक नवीन फीचर मिळेल, जे एडल्ट आणि इरोटीक कंटेट मिळून देईल. हे फीचर मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि मनोरंजन वाढविण्यासाठी डिझाइन केलेले आहे. या फीचरचा वापर करण्यासाठी युजर्सना वय पडताळणी पूर्ण करावी लागेल, त्यानंतर ते अश्लील कंटेट पाहू शकतील.