ChatGPT चा सर्वात स्वस्त प्लॅन लॉन्च, फक्त ३९९ रुपयांमध्ये मिळतील प्रीमियम फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:19 IST2025-08-19T17:18:43+5:302025-08-19T17:19:07+5:30
OpenAI ने आपल्या लोकप्रिय ChatGPT चा नवीन प्लॅन लॉन्च केला आहे.

ChatGPT चा सर्वात स्वस्त प्लॅन लॉन्च, फक्त ३९९ रुपयांमध्ये मिळतील प्रीमियम फीचर्स
OpenAI ने त्यांच्या लोकप्रिय AI चॅटबॉट ChatGPT चा सर्वात स्वस्त सबस्क्रिप्शन प्लॅन ChatGPT Go लॉन्च केला आहे. कंपनीचा हा नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन युजर्सना परवडणाऱ्या किमतीत ChatGPT च्या नवीन फीचर्सचा वापर करण्याची सुविधा देतो. नवीन प्लॅनची घोषणा करताना, ChatGPT चे उपाध्यक्ष आणि प्रमुख निक टर्ली यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आणि सांगितले की, ChatGPT Go द्वारे युजर्सना मोफत प्लॅनच्या तुलनेत १० पट अधिक लिमिट, १० पट अधिक इमेज जनरेशन, १० पट अधिक फाइल अपलोड आणि २ पट अधिक मेमरी यासारख्या विशेष फीचर्सचा लाभ मिळेल.
ChatGPT Go ची किंमत
ChatGPT Go सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला दरमहा ३९९ रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे, हा प्लॅन UPI पेमेंटला देखील सपोर्ट करतो. हा प्लॅन घेण्यासाठी ChatGPT अकाउंटमध्ये लॉग इन करून प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा. येथे तुम्ही अपग्रेड प्लॅनवर टॅप करा, तुम्हाला Try GO पर्याय दिसेल. हा प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्ही
प्लॅनमध्ये काय मिळेल?
Chatgpt Go प्लॅनमध्ये मोफत प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. यासोबतच, प्लॅनमध्ये GPT-5 चा एक्सटेंडेड अॅक्सेस, इमेज जनरेशनचा एक्सटेंडेड अॅक्सेस, फाइल अपलोडचा एक्सटेंडेड अॅक्सेस आणि प्रगत डेटा विश्लेषणाचा एक्सटेंडेड अॅक्सेस मिळेल. मात्र, यामध्ये GPT-4o आणि Sora व्हिडिओ क्रिएशनचा अॅक्सेस मिळत नाही. ही सर्व प्रीमियम वैशिष्ट्ये तुम्हाला ChatGPT Plus सबस्क्रिप्शनमध्ये मिळतात. त्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात.