CES 2019 : सोनीने लाँच केला तब्बल 98 इंचाचा टीव्ही 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 03:54 PM2019-01-10T15:54:13+5:302019-01-10T16:36:43+5:30

CES 2019 मध्ये सोनीने दोन स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. Z9G 8K (LCD) आणि A9G 4K OLED या दोन टीव्हीचा यामध्ये समावेश आहे. यामधील A9G 4K OLED टीव्ही तीन वेगवेगळ्या स्वरुपात म्हणजेच 55, 65 आणि 77 इंचाचा टीव्ही आहे.

CES 2019: Sony’s Master Series Z9G 8K, A9G, A8G, X950G 4K TVs Launched | CES 2019 : सोनीने लाँच केला तब्बल 98 इंचाचा टीव्ही 

CES 2019 : सोनीने लाँच केला तब्बल 98 इंचाचा टीव्ही 

Next
ठळक मुद्देसोनीने मास्टर सीरिज अंतर्गत तब्बल 98 इंचाचा टीव्ही लाँच केला आहे. CES 2019 मध्ये सोनीने दोन स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. Z9G 8K (LCD) आणि A9G 4K OLED या दोन टीव्हीचा यामध्ये समावेश आहे.A9G 4K OLED टीव्ही तीन वेगवेगळ्या स्वरुपात म्हणजेच 55, 65 आणि 77 इंचाचा टीव्ही आहे. तर  Z9G 8K (LCD)  टीव्ही85 आणि 98 इंचाचा या दोन प्रकारात  लाँच करण्यात आले आहेत. 

नवी दिल्ली - अमेरिकेच्या लास वेगासमध्ये जगातील सर्वात मोठ्या टेक्नोलॉजीच्या  Consumer Electronics Show (CES) चे आयोजन करण्यात आले आहे. या शोमध्ये सोनीने मास्टर सीरिज अंतर्गत तब्बल 98 इंचाचा टीव्ही लाँच केला आहे. CES 2019 मध्ये सोनीने दोन स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. Z9G 8K (LCD) आणि A9G 4K OLED या दोन टीव्हीचा यामध्ये समावेश आहे. यामधील A9G 4K OLED टीव्ही तीन वेगवेगळ्या स्वरुपात म्हणजेच 55, 65 आणि 77 इंचाचा टीव्ही आहे. तर  Z9G 8K (LCD)  टीव्ही 85 आणि 98 इंचाचा या दोन प्रकारात लाँच करण्यात आले आहेत. 

सोनीच्या Z9G 8K (LCD) आणि A9G 4K OLED या दोन टीव्हीमध्ये X1 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. 8K सपोर्टसाठी तयार करण्यात आला आहे, असा दावा कंपनीने केला आहे. हा टीव्ही 33 दशलक्ष पिक्सल या क्षमतेचा आहे. यामुळे पिक्चरची क्वॉलिटी अधिक स्पष्ट दिसते. या दोन्ही टीव्हीच्या डिस्प्लेमध्येच ऑडिओ पॅनेल असून टीव्हीच्या समोर 4 स्पीकर्स लावण्यात आले आहेत. सोनीने अद्याप या टीव्हीची किंमत जाहीर केलेली नाही.  तसेच या दोन्ही टीव्हीची विक्री कधीपासून सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

CES 2019 : आपलं जगणं सोपं करण्यासाठी येतेय 'ब्रेडबोट'

CES 2019 : 'या' ६ टेक्नॉलॉजी जग बदलण्यासाठी येताहेत, तयार रहा!

सोनी कंपनीच्या तोडीची अफलातून तंत्रज्ञान विकसित करणारी दक्षिण कोरियाची कंपनी एलजीने जगातील पहिलाच कॅलेंडरसारखा गुंडाळणारा टीव्ही सीईएसमध्ये दाखविला आहे. हा टीव्ही ओएलईडी टेक्नॉलॉजी सोबत येणार आहे. एलजीचा हा टीव्ही एका छोट्याशा साऊंड बारमध्ये जेव्हा आपल्याला टीव्ही पाहायचा नसेल तोपर्यंत ठेवता येतो. जेव्हा टीव्ही पाहायचा असेल तेव्हा एका बटनावर तो हळू हळू वर येऊ लागतो. कंपनीने गेल्या वर्षीच्याच सीईएसमध्ये या टीव्हीचे कन्सेप्ट दाखविण्यात आली होती. कंपनीने वर्षभरात या टीव्हीमध्ये मोठे संशोधन करून आणखी चांगले बनविले आहे. एलजीचा हा जागा वाचविणारा टीव्ही OLED TV R या नावाने प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आला होता. 65 इंचाचा हा टीव्ही सिग्नेचर ओएलईडी टीव्ही पुढील वर्षी बाजारात येणार आहे. 
 

Web Title: CES 2019: Sony’s Master Series Z9G 8K, A9G, A8G, X950G 4K TVs Launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.