CES 2019 : 'या' ६ टेक्नॉलॉजी जग बदलण्यासाठी येताहेत, तयार रहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 04:06 PM2019-01-08T16:06:00+5:302019-01-08T16:24:52+5:30

तुम्हाला काही रस असो अथवा नसो पण टेक्नॉलॉजीच्या विश्वात Consumer Electronics Show चं फार मोठं स्थान आहे. कारण इथे जगभरातील कंपन्यांना त्यांचे नवनवीन प्रॉडक्ट जगासमोर आणण्याची संधी मिळते.

CES 2019 : These Six trends that will change the world | CES 2019 : 'या' ६ टेक्नॉलॉजी जग बदलण्यासाठी येताहेत, तयार रहा!

CES 2019 : 'या' ६ टेक्नॉलॉजी जग बदलण्यासाठी येताहेत, तयार रहा!

Next

(Image Credit : www.engadget.com)

तुम्हाला काही रस असो अथवा नसो पण टेक्नॉलॉजीच्या विश्वात Consumer Electronics Show चं फार मोठं स्थान आहे. कारण इथे जगभरातील कंपन्यांना त्यांचे नवनवीन प्रॉडक्ट जगासमोर आणण्याची संधी मिळते. यावेळी १ लाख ८० हजार लोक इथे भेट देण्यासाठी आले आहेत. आणि ४ हजार ५०० कंपन्या लास वेगासमध्ये त्यांनी तयार केलेले नवे प्रॉडक्ट दाखवण्यासाठी एकत्र आले आहेत. केवळ इतकाच या शो चा उद्देश नाही तर या माध्यमातून जगभरातील टेक्नॉलॉजी कोणत्या दिशेने जात आहे. त्यात काय प्रगती होत आहे हेही बघायला मिळतं. यंदा या शोमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे टेक्नॉलॉजीतील ट्रेन्ड बदलला जाणार आहे, हे जाणून घेऊ. 

5G नेटवर्क

स्मार्टफोनच्या विश्वात टेक्नॉलॉजी 4G नेटवर्कवरुन 5G नेटवर्क होणार आहे. 4G वरुन  5G नेटवर्कवर शिफ्ट होणे ही केवळ एक सामान्य प्रोसेस नाही. 4G हे लोकांना जोडणारं नेटवर्क म्हटलं जात होतं. 5G सुद्धा तसंच लोकांना जोडणारं आहे. पण सोबतच इतरही काही गोष्टी याने जोडल्या जाणार आहेत.  

5G म्हटलं तर टेक्नॉलॉजीमध्ये नवी क्रांती येणार आहे. कारण 5G नेटवर्क हे 4G पेक्षा १ हजार पटीने वेगवान मानलं जातं. त्यामुळे ही टेक्नॉलॉजी वापरात आल्यानंतर दैनंदिन गरजांशी जुळलेल्या तांत्रिक सुविधाही हायटेक होणार आहेत. यंदा CES 2019 मध्ये Qualcomm कंपनीने 5G नेटवर्कचं सादरीकरण केलं. त्यांनी हे दाखवलं की, फिक्स्ड वायरलेस सिस्टीमच्या माध्यमातून कशाप्रकारे फायबर पोहोचू शकत नाही तिथे 5G पोहोचतं. आता तर लोकांचे मोबइल डिव्हाइस 5G नेटवर्कमध्ये कन्व्हर्टही झालेले बघतो आहोत. 

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

CES 2019 मध्ये ट्रेंड बदलणारी आणखी एक गोष्ट म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स. शोमध्ये एआय प्रोसेसर आणि चीप्सवर फोकस करण्यात आलं आहे. त्यासोबतच त्या कंपन्यांवरही फोकस करण्यात आलं आहे, ज्या ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी एआयचा वापर करताहेत. म्हणजे आता टीव्ही सेट्समध्ये एआयचा वापर चित्रांची रंगसंगती रुममधील प्रकाशाच्या दृष्टीने बदलण्यासाठी केला जात आहे. तर कॅमेरा एआयचा वापर चित्रांच्या क्वालिटीवर लक्ष ठेवण्यासाठी मॉनिटर म्हणून करत आहेत. म्हणजे या टेक्नॉलॉजीचा परिमाण असा होईल की, येणाऱ्या काळात 'adjusting settings' ही सुविधाच कालबाह्य होईल. 

या डिजिटल गोष्टींचा वापर आता कार, साऊंडबार्स, लॅपटॉप, टीव्ही सेट्समध्ये होतो आहे. यातील अनेक गोष्टी CES शोमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. जसे की, अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा किंवा गुगल असिस्टंट. यातही एआयचा वापर करुन आवाजाच्या माध्यमातून कामे करता येत आहेत. 

8K

टीव्हीच्या रिझोल्यूशनने टेक्नॉलॉजीचा ट्रेन्ड बदलला जाणार आहे. कारण आता 8K सपोर्ट असलेले टीव्ही बाजारात दाखल होणार आहेत. सोनी कंपनीने असे दोन टीव्ही लॉन्च केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, या दोन्ही टीव्हीमध्ये एकच प्रोसेसर X1 चा वापर करण्यात आला आहे. हे प्रोसेसर खासकरुन 8K सपोर्टसाठी तयार केलं गेलं आहे. सोनीने लॉन्च केलेला असा पहिला कंज्यूमर टीव्ही आहे, ज्यात 8K सपोर्ट दिला गेला आहे. हा टीव्ही ३२ मिलियन पिक्सलला सपोर्ट करतो. याने प्रेक्षकांना चांगल्या क्वालिटीचं चित्र बघायला मिळणार आहे. 

ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी

ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी(एआर) हे वर्षभर फारच चर्चेचं राहिलं आहे. आतापर्यंत याचा वापर केवळ फेस फिल्टर सेल्फीसाठी केला जात होता. एआर ही काही नवीन टेक्नॉलॉजी नाहीये. मात्र यात फार जास्त सुधारणा झाल्या आहेत. आता प्रत्येक यूजर आपला कॉन्टेन्ट तयार करु शकतो. व्हर्चुअल रिअ‍ॅलिटीचंच दुसरं रुप म्हणजे ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी आहे. एक अशी टेक्नॉलॉजी ज्यात तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाशी मिळतं-जुळतं वातावरण एका कम्प्युटर द्वारे तयार केलं जातं. म्हणजे एक आभासी जग तयार करता येऊ शकतं. याचा वापर डिजिटल गेमिंग, शिक्षण, इंजिनिअरींग डिझाइन, रोबोटिक्स, आरोग्य आणि शॉपिंग क्षेत्रात होत आहे. CES 2019 मध्ये काही कंपन्यांनी या टेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार केलेले स्मार्ट मिरर इथे लॉन्च केले आहेत. 

लेव्हल थ्री सेल्फ ड्रायविंग वाहने

CES मध्ये याआधी 'व्हल टू'ची सेल्फ ड्रायव्हिंग वाहने सादर करण्यात आली होती. त्यामुळे यंदा आता CES 2019 मध्ये लेव्हल थ्री सेल्फ ड्रायविंग वाहनांचा धुमाकूळ बघायला मिळाला आहे. या गाड्याही आता लवकरच रस्त्यावर धावताना बघायला मिळणार आहे. त्यामुळे ऑटो विश्वात एक मोठी क्रांतीच होणार आहे.  

रेसिलीएंट टेक्नॉलॉजी

CES 2019 रेसिलिएंट टेक्नॉलॉजीही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. स्मार्ट सिटीज या रेसिलिएंट टेक्नॉलॉजी अभावी असुरक्षित मानल्या जातात. केवळ सायबर अटॅकच नाही तर त्सुनामी आणि भूकंप यामुळेही स्मार्ट सिटींना धोका आहे. अशात जेव्हा अशी काही नैसर्गिक आपत्ती आली तर इतक्या लोकांना अन्न कसं पुरवलं जाणार, त्यांना पाणी कसं देणार, त्यांना वीज कशी मिळणार? हे प्रश्न उपस्थित होतात. मात्र या शोमध्ये अशा स्थितीत आपला बचाव करण्यासाठी उपयोगी पडणारे अनेक प्रॉडक्ट्स सादर करण्यात आले आहेत. खासकरुन सर्वांच लक्ष वेधलं ते वॉटरजेनने. वॉटरजेन या टेक्नॉलॉजीला CES 2019 मध्ये बेस्ट इनोवेशन अवॉर्ड मिळाला आहे. या यंत्राच्या माध्यमातून हवेपासून पाणी कसं तयार करायचं हे दाखवण्यात आलं आहे. 
 

Web Title: CES 2019 : These Six trends that will change the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.