शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

CES 2019: LG चा चमत्कार, 'हा' पाहा गुंडाळून ठेवता येणारा टीव्ही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 15:25 IST

हा टीव्ही ओएलईडी टेक्नॉलॉजी सोबत येणार आहे.

सोनी कंपनीच्या तोडीची अफलातून तंत्रज्ञान विकसित करणारी दक्षिण कोरियाची कंपनी एलजीने जगातील पहिलाच कॅलेंडरसारखा गुंडाळणारा टीव्ही सीईएसमध्ये दाखविला. हा टीव्ही ओएलईडी टेक्नॉलॉजी सोबत येणार आहे.

एलजीचा हा टीव्ही एका छोट्याशा साऊंड बारमध्ये जेव्हा आपल्याला टीव्ही पाहायचा नसेल तोपर्यंत ठेवता येतो. जेव्हा टीव्ही पाहायचा असेल तेव्हा एका बटनावर तो हळू हळू वर येऊ लागतो. कंपनीने गेल्या वर्षीच्याच सीईएसमध्ये या टीव्हीचे कन्सेप्ट दाखविण्यात आली होती. कंपनीने वर्षभरात या टीव्हीमध्ये मोठे संशोधन करून आणखी चांगले बनविले आहे. 

एलजीचा हा जागा वाचविणारा टीव्ही OLED TV R या नावाने प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आला होता. 65 इंचाचा हा टीव्ही सिग्नेचर ओएलईडी टीव्ही पुढील वर्षी बाजारात येणार आहे. 

एलजीने सांगितले की, कंपनीने आणलेला हा गुंडाळणारा टीव्ही बाजारातील सारा खेळच पालटून टाकेल. हा टीव्ही पाहणाऱ्यांना भींतीच्या सीमांपासून मुक्त करेल. घरामध्ये यापुढे टीव्ही ठेवण्यासाठी जागा आरक्षित ठेवावी लागणार नाही. जेव्हा टीव्ही पाहायचा नसेल तेव्हा हा टीव्ही एका साऊंड बारमध्ये गुंडाळून ठेवता येतो.

एलजीने लाँच केलेल्या या  4K OLED टीव्हीमध्ये 65 इंचाचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या टीव्हीला आपल्या गरजेनुसार रोल अप-डाऊन करता येते. हा टीव्ही केवळ 10 सेकंदात गुंडाळला जाऊन साऊंड बारमध्ये रुपांतरीत होतो. यामुळे हा टीव्ही कुठेही ठेवता येणार आहे. 

वेगळ्या अ‍ॅमेझऑन अ‍ॅलेक्साची गरज नाही...हा टीव्ही असल्यास वेगळ्या अ‍ॅ​​​​​​​मेझॉन अ‍ॅ​​​​​​​लेक्साची गरज भासणार नाही. कारण या टीव्हीमध्ये अ‍ॅ​​​​​​​लेक्सा इनबिल्ट आहे. टीव्हीच्या रिमोटवरील बटनावरून अ‍ॅ​​​​​​​लेक्सा वापरता येणार आहे. हा टीव्ही वेबओएसवर चालतो. 

लाईन मोड म्हणजे काय? या टीव्हीमध्ये एक लाईन मोडही देण्यात आला आहे. म्हणजेच हा टीव्ही चालू केल्यानंतर या मोडवर टीव्हीचा केवळ एक चतुर्थांश भागच बाहेर येणार आहे. या मोडद्वारे गाणी ऐकणे, व्हॉईस असिस्टंस आणि स्मार्टहोमची अन्य उपकरणे नियंत्रित करता येणार आहेत. 

टॅग्स :CES 2019सीईएसTelevisionटेलिव्हिजनLGएलजी